महाराष्ट्राच्या लाडक्या जत्रेकरींचा 'लास्ट स्टॉप खांदा'
'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील निखिल बने, मंदार मांडवकर, प्रियांका हांडे, प्रभाकर मोरे हे विनोदवीरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासह जुईली टेमकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे कलाकार या चित्रपटात झळकतील. चिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे.
advertisement
'लास्ट स्टॉप खांदा' कधी होणार रिलीज?
प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर 'लास्ट स्टॉप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी, फ्रेश जोडी या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. उत्तम कथानक, खुसखुशीत संवादाची फोडणी असलेल्या या चित्रपटाला श्रवणीय संगीताचीही साथ आहे. एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट असली, तरी प्रत्येकालाच आपलीशी वाटेल अशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता 21 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.