TRENDING:

Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानच्या मालिकेत गायक महेश काळेची एन्ट्री! प्रोमो पाहून प्रेक्षकांची भलतीच फरमाईश

Last Updated:

Mahesh Kale in Tejashri Pradhan Serial : तेजश्री प्रधानच्या मालिकेत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेची एन्ट्री होणार आहे. महेश काळेच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरच्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत तिनं साकारलेली स्वानंदीची भूमिका प्रेक्षकांना आवडली. तेजश्रीच्या नव्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. मालिकेत सध्या समर आणि स्वानंदी यांच्या प्रेमाची सुरूवात दाखवण्यात आली आहे. समर स्वानंदीचं मनं जिंकण्याचे प्रयत्न करतोय. अशातच मालिकेत एक नवीन बदल पाहायला मिळणार आहे. तेजश्री प्रधानच्या मालिकेत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेची एन्ट्री होणार आहे. महेश काळेच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
News18
News18
advertisement

प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, समर स्वानंदीला फोन करून सांगतो, "खूप मोठा प्रोब्लेम झाला आहे. तुम्ही बाबांना घ्या आणि मी पत्ता पाठवतो तिथे या." स्वानंदी तिच्या बाबांना घेऊन पत्त्यावर पोहोचते. पत्त्यावर पोहोचताच तिथे गायक महेश काळेची संगीत मैफिल सुरू असते. स्वानंदीचे बाबा तिला सांगतात, "मला महेश काळेंची गाणी खूप आवडतात. माझी इच्छा होती त्यांची भेट व्हायला हवी." तेवढ्यात मागून महेश काळे चालत येतात. पाहून स्वानंदी आणि तिचे बाबा आश्चर्यचकीत होतात.

advertisement

( शिवाने आदित्यला पळवलं! पारू मालिका बंद झाल्यानंतर नवी मालिका पाहून रंगली भलतीच चर्चा )

महेश काळे स्वानंदीला म्हणतात, "वहिनी तुम्ही खूप लकी आहात. समर सारखा नवरा तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही." आता समरचा हा सुरेल नजराणा स्वानंदीचं मन जिंकणार का? हे पाहणं मालिकेच्या येत्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

दरम्यान मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत महेश काळेंच्या गाण्यांची फरमाईश केली आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "सुरेख आणि सुरेल अशी ही कल्पना… महेशजींचा कार्यक्रम सीरियलमधल्या वाढदिवसाला एक वेगळीच रंगत आणणार! ह्यात एक ‘कट्यार’मधील गाणं नक्की होऊ द्या." दुसऱ्यानं लिहिलंय, "क्या बात हैं, महेश जींची गाणी होऊन जाऊद्या." आता मालिकेच्या येत्या भागात महेश काळेंच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहेच पण प्रेक्षकांनी केलेली फरमाईश ऐकायला मिळणार का?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'एक डबा दोघांमध्ये अन् रविवारी उपाशी राहावं लागतंय' पुण्यातलं वास्तव्य, विद्यार्थी निघाले गावाकडे!
सर्व पहा

गायक महेश काळे आणि अभिनेता सुबोध भावे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी याआधी कट्यार काळजात घुसली या सिनेमात एकत्र काम केलं आहे. सिनेमासाठी सुबोधने महेश काळेकडून गाण्यासाठी अनेक टीप्स घेतल्या होत्या.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानच्या मालिकेत गायक महेश काळेची एन्ट्री! प्रोमो पाहून प्रेक्षकांची भलतीच फरमाईश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल