हा अभिनेता इंडस्ट्रीत खलनायक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होता. इंडस्ट्रीचा एक तगडा खलनायक म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आतापर्यंत अनेक अजरामवर कलाकृतींमध्ये काम केलं आहे. त्याची मोठी फॅन फॉलोविंग आहे. पण त्याच्या अकाली जाण्याने सगळेच हादरले आहेत.
( शाहिद कपूरच्या O Romeoमध्ये नाना पाटेकरांबरोबर हा मराठी गायक, ट्रेलरमध्ये दिसला डॅशिंग अवतार )
advertisement
मलयाळम फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी आणि दिवंगत अभिनेत्री कल्पना यांचा भाऊ अभिनेता कमल रॉय यांचं निधन झालं आहे. 54 व्या वर्षी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमल रॉय यांचा मृत्यू हार्ट फेल्युअरमुळे झाला आहे. गेल्या काही काळापासून ते चित्रपटसृष्टीत फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. विशेषतः गंभीर आणि नकारात्मक भूमिका साकारून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच मलयालम इंडस्ट्रीत त्यांची ओळख प्रामुख्याने एक ताकदवान खलनायक म्हणून होती.
कमल रॉय प्रसिद्ध नाट्यकलाकार चावरा व्ही. पी. नायर आणि विजयलक्ष्मी यांचा मुलगा. अभिनयाचं बाळकडू त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळालं. कुटुंबातील पाच भावंडांपैकी चार जणांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. त्यांच्या बहिणी उर्वशी, कल्पना आणि कलरंजिनी या मलयालम सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री राहिल्या, तर भाऊ प्रिन्स हेही अभिनेता होते. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा सूरनाड कुंजन पिल्लई हे प्रसिद्ध कोश-लेखक, इतिहासकार, कवी आणि टीकाकार होते.
छोट्या पडद्यावरही कमल रॉय यांनी आपली छाप सोडली होती. 'शारदा' सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. कमल रॉय यांच्या निधनाने मलयाळम इंडस्ट्रीने एक तगडा खलनायक गमावला आहे. त्यांच्या अभिनयामुळे ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.
