नेमकं काय घडलं?
नव्या नायर ओणम सण साजरा करण्यासाठी विक्टोरियामधील मल्याळी असोसिएशनच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जात होती. त्यावेळी तिच्या वडिलांनीच तिला गजरा विकत घेऊन दिला होता. वडिलांच्या सांगण्यावरून तिने गजरा दोन तुकड्यांमध्ये कापला. एक तुकडा तिने कोची ते सिंगापूर प्रवासात वापरला.
advertisement
सिंगापूरला पोहोचेपर्यंत तो गजरा सुकला होता. त्यामुळे, वडिलांनी तिला दुसरा गजरा तिच्या हँडबॅगमध्ये ठेवण्यास सांगितलं, जेणेकरून ती सिंगापूरच्या विमानतळावर तो वापरू शकेल. नव्याला माहित नव्हतं की ती नकळत एक मोठा गुन्हा करत आहे.
१.२५ लाखांचा दंड का बसला?
नव्या जेव्हा मेलबर्न विमानतळावर पोहोचली, तेव्हा अधिकाऱ्यांनी तपासणी करताना तिच्या हँडबॅगमध्ये तो गजरा पाहिला. त्यानंतर त्यांनी तिच्यावर १९८० ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड लावला. या घटनेबद्दल नव्याने ओणम कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, “मला माहित आहे की मी चुकले, पण हे जाणूनबुजून केलं नव्हतं.” अधिकाऱ्यांनी तिला २८ दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा नियम काय सांगतो?
ऑस्ट्रेलियाई बॉर्डर फोर्सच्या वेबसाइटनुसार, झाडं, फुलं आणि बिया देशात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. ज्यांच्याकडे कायदेशीर परवानगी आहे, तेच फक्त अशा वस्तू घेऊन जाऊ शकतात. ऑस्ट्रेलिया अशा झाडांना आणि फुलांना धोकादायक मानतो, कारण यामुळे त्यांच्या देशातील वातावरणात रोग किंवा किडे पसरू शकतात.