‘कॅप्टन कूल’चा ॲक्शन मोड ऑन! MS Dhoni चं धमाकेदार ॲक्टिंग डेब्यू, स्टार अभिनेत्यासोबत गाजवणार स्क्रीन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
MS Dhoni Bollywood debut : लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घातल्यानंतर आता अभिनयाच्या जगातही एन्ट्री केली आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घातल्यानंतर आता अभिनयाच्या जगातही एन्ट्री केली आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलिवूड अभिनेता आर. माधवनसोबत दिसला आहे, ज्यामुळे चाहतेही थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ एका आगामी प्रोजेक्टचा टीझर आहे, ज्याचं नाव 'द चेज' आहे. या टीझरने सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे, कारण धोनी पहिल्यांदाच अॅक्शन अवतारात दिसत आहे.
पोलिसाच्या भूमिकेत धोनी आणि माधवन!
'द चेज' या टीझरमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि आर. माधवन दोघेही पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहेत. ते जोरदार गोळीबार करताना आणि अॅक्शन करताना दिसत आहेत. हा टीझर पाहून चाहते खूपच उत्साहित झाले आहेत, पण हा टीझर एका चित्रपटाचा आहे की जाहिरातीचा, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. टीझरमध्ये फक्त एवढंच सांगितलं आहे की, याला बसन बाला यांनी दिग्दर्शित केलं आहे, ज्यांनी अभिनेत्री आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं.
advertisement
advertisement
आर. माधवनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “वन मिशन, टू फायटर्स! तयार व्हा, एक धमाकेदार ‘चेज’ सुरू होणार आहे.” या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “ओएमजी! माही आणि मॅडी, दोघेही एकत्र. हे खूपच रोमांचक आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “आशा आहे, हा एक चित्रपट असेल, जाहिरात नसेल, कारण टीझर खूपच दमदार आहे.”
advertisement
आर. माधवन नुकताच फातिमा सना शेखसोबत नेटफ्लिक्सच्या 'आप जैसा कोई' या चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच दिग्दर्शक आदित्य धरच्या 'धुरंधर' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
‘कॅप्टन कूल’चा ॲक्शन मोड ऑन! MS Dhoni चं धमाकेदार ॲक्टिंग डेब्यू, स्टार अभिनेत्यासोबत गाजवणार स्क्रीन