मन तुझं जलतरंग
प्रसिद्ध मराठी गीतकार वैभव जोशी यांच्या ऋतु बरवा या कार्यक्रमात ते मन तुझं जलतरंग... ही कविता सादर करतात. मागच्या काही वर्षात त्यांच्या कविता आणि गाण्यांचे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत. काही महिन्यांआधीच त्यांनी मन तुझं जलतरंगचा एक रील सोशल मीडियावर पोस्ट केला. वैभव जोशी यांची कविता, मागे वाजणारा तबला आणि शेवटी बासरीवादक अमर ओक यांनी वाजवलेली बारसी हे कॉम्बिनेशन असं काही जुळून आलंय की पाहणारा आणि ऐकणारा प्रत्येक प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडला आहे.
advertisement
( मराठीत कौतुक अन् त्या हिंदी नटीनं मारली मिठी, मांजरेकर ट्रॉफीही घ्यायला विसरले, VIDEO )
अमर ओक यांच्या बासरीतून येणारं ते गाणं कोणतं?
अमर ओक यांच्या बासरीतून येणारं ते गाणं आहे 'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी'. फक्त बासरीच्या सुरात त्यांनी ते गाणं सादर केलं आहे. त्यांच्या बासरीतून येणारं 'छबीदार छबी' हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतं. 'छबीदार छबी' ही पिंजरा या मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमातील लावणी आहे. उशा मंगेशकर यांनी त्यांच्या ठसकेदार आवाजात ही लावणी गायली आहे.
व्ही. शांताराम यांचा अजरामर सिनेमा
1972 साली व्ही. शांताराम यांनी हा सिनेमा तयार केला होता. व्ही. शांताराम हे स्वत: या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. श्रीराम लागू, निळू फुले आणि संध्या शांताराम हे मराठीतील ज्येष्ठ मंडळी या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. एक तत्वनिष्ठ आणि ब्रम्हचारी शिक्षक तमासगिरणीला सुधारण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात तो क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकतो आणि त्याच्याच आयुष्याची चक्र फिरतात. पिंजरा हा मराठी सिनेसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो.
पिंजराची अजरामर गाणी
पिंजरा या तमाशाप्रधान सिनेमातील अनेक लावण्या अजरामर झाल्या. अभिनेत्री संध्या यांच्यावर अनेक लावण्या चित्रीत करण्यात आल्या. त्यातील एक 'छबीदार छबी' ही लावणी आहे. 'आली ठुमकत नार लचकत', 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली', 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल', 'दिसला ग बाई दिसला', 'दे रे कान्हा चोळी लुगडी', 'मला इष्काची इंगळी डसली', 'मला लागली कुणाची उचकी' ही सिनेमातील सगळी गाणी अजरामर झालीत.