TRENDING:

Tejpal Wagh : अभिनेता तेजपाल वाघ नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात? इन्स्टाग्राम पोस्टमधून थेट संकेत

Last Updated:

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' सारख्या शोमधून पुढे आलेला प्रसिद्ध अभिनेता नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अभिनेत्याने पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नुकताच राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान अनेक कलाकार मंडळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेता तेजपाल वाघ नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तेजपालने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत थेट संकेत दिले आहेत.
News18
News18
advertisement

अभिनेता तेजपाल वाघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहे. काही दिवसांआधीच तेजपालची संस्कृतीक विभागाचे राज्य प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तेजपालने व्हिडीओ शेअर करत सगळ्यांचे आभार मानले होते. दरम्यान तेजपाल वाघ नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून मिळाले आहेत.

( Suraj Chavan Wife : 'मीच त्यांची होणारी बायको' म्हणत अखेर समोर आली सूरज चव्हाणची लाईफ पार्टनर, PHOTO )

advertisement

अरे काही तरी कर वाईकर... मी नाही, आपण लढूया... आपल्या वाईला आपण घडवूया...! असं म्हणत त्याने पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "आजवर मला वाईने, वाईकरांनी भरपूर प्रेम दिलं.. आता आपल्या वाईसाठी काहीतरी करायची वेळ आली आहे."

तेजपालने पुढे लिहिलंय, "वाई शहरात अनेक समस्या आहेत ज्या सामान्य वाईकर नागरिकाला रोज भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी आपल्यालाच वाई नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. हा आपला वाईकर नागरिकांचा लढा आहे आणि तो आपण एकत्र मिळून लढूया..! ही लढाई कोणत्याही राजकीय नेतृत्वाच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर ही आपल्या प्रश्नांच्या, अडचणींच्या विरोधात आहे. हा लढा आपण एकत्र मिळून लढूया आणि आपल्या वाईला घडवूया..!! आपलाच - तेजपाल जयंत वाघ."  या पोस्टसह तेजपालने वाई, वाईचा वाघ, नगरपालिका 2025 असे हॅशटॅगही शेअर केलेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1 लाख 25 हजार दिवे, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले दगडूशेठ गणपती मंदिर
सर्व पहा

अभिनेता तेजपाल वाघबद्दल सांगायचं झाल्यास, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या रिअलिटी शोमधून तो पुढे आला. सुरुवातीला त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्याने त्याचा मोर्चा लेखनाकडे वळवला. सध्या त्याची 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका सुरू आहे.  त्याने 'सहकुटुंब सहपरिवार', 'कारभारी लई भारी' सारख्या मालिका लिहिल्या. त्याचबरोबर 'पळशीची पिटी', 'ओली की सुकी', 'तुझं तू माझं मी' सारख्या मराठी सिनेमांसाठीही लेखन, संवाद लिहिले आहेत. अभिनयाबरोबरच तेजपालला सामाजिक कार्य आणि राजकारणाची आवड आहे. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता तो नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejpal Wagh : अभिनेता तेजपाल वाघ नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात? इन्स्टाग्राम पोस्टमधून थेट संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल