पद्मश्री जोशी यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत कॅन्सरच्या ट्रिटमेंटवेळी आलेल्या आव्हानांबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, "पहिली मदत देवाची झाली. ज्या वेळेस तुमच्यावर संकट येतात तेव्हा तो तितकीच संकट देतो जी सहन करण्याची तुमच्यात ताकद आहे.मानसिक खंबीरपणा कसा ठेवायचा, त्याला मानसिक सपोर्ट कसा द्यायचा या दृष्टीने मी आणि माझा मुलगा करत होते. इंडस्ट्रीत आम्ही कोणाला सांगितलं नाही. त्याच्या पहिल्या चार किमो झाल्या नंतर दोन सर्जरी झाल्या. त्यानंतर मी विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांना सांगितलं. हे त्रिकुट आहेत त्यामुळे त्यांना माहिती असलं पाहिजे होते. बाकी कोणाला कळू दिलं नाही".
advertisement
"एका वेळेस मुख्यमंत्र्यांच्या मदतीची आम्हाला गरज होती तेव्हा आम्ही सुशांत शेलार आणि मंगेश यांना फोन केला. त्यांनी मला मदत केली. मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं त्यांनी मदत केली. पण संकट येतात तेव्हा ती दोन्ही बाजूने येतात. विजयचं पहिलं किमो करायचं ठरलं. त्यानंतर पहिला फोन मी इन्शुरन्स कंपनीला केला. त्यांना सगळं सांगितलं. आम्ही नानावटी रुग्णालयात किमो करायचं ठरवलं. त्यांच्या लिस्ट ऑफ कॅश लेस रुग्णालयात नानावटी रुग्णालय होतं".
त्यांनी पुढे सांगितलं, "इन्शुरन्स कंपनीशी बोलून मी कॅशलेस फॉर्म भरला. फेब्रुवारी महिन्यात ट्रिटमेंट सुरू झाली. मला लेटर आलं की तुमचा इन्शुरन्स अप्रुव करू शकत नाही कारण त्यांना डायबिटिज आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. मी त्यांना दाखवलं तुमच्या पहिल्या पेजवर लिहिलंय की 14 वर्षांपासून त्याला डायबिटीज आहे".
"विमा लोकपालमध्ये केस केली. तारखेला जाऊन उभी राहत होते केस लढले, निकाल माझ्या बाजूने लागला तरीही ते पैसे भरायला नव्हते. त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतली", असंही त्यांनी सांगितलं.
