Hina Khan : 'पाय सुन्न पडले तरी...' कॅन्सरशी झुंज, आजारपणातही हिना खानने सोडलं नाही हे काम; तुम्ही कराल कौतुक
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
कॅन्सरच्या उपचारांमुळे हिनाचे केस देखील गेले आहेत. पण सध्या हिना सगळ्या संकटाना ठाम राहून तोंड देतेय. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. जो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
मुंबई : अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली होती. हिनाच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कॅन्सरच्या उपचारांमुळे हिनाचे केस देखील गेले आहेत. पण सध्या हिना सगळ्या संकटाना ठाम राहून तोंड देतेय. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. जो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
हिना खान सध्या स्टेज 3 कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्रीवर केमोथेरपीचे उपचार सुरू असून त्यामुळे तिला तीव्र वेदना होत आहेत. मात्र, एवढ्या दुःखातही हार न मानण्याचा निर्धार अभिनेत्रीनं केला आहे.हिनावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या काळात हिना शूटिंग देखील करत आहे. एवढंच नाही तर आजारपणातही तिने जिममध्ये जाणं सोडलं नाहीये. नुकतंच तिने याविषयी पोस्ट शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे.
advertisement
'या' अभिनेत्रीनं मैत्रिणीच्या नवऱ्याशीचं केलं धुमधडाक्यात लग्न; MMS लीकमुळे उडाली खळबळ
हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मुसळधार पावसात जिममध्ये जाताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हिनानं कॅन्सरच्या उपचारांदरम्यान व्यायामाचं महत्त्व सांगितलं आहे. हिनानं, 'केमोथेरपीमुळे तिचे पाय सुन्न झाले आहेत, मात्र व्यायामामुळे तिला खूप फायदा होतो.' असा अनुभव सांगितलं आहे.
advertisement
हिना म्हणाली, ''स्वस्थ जीवनशैली राखण्यासाठी व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया महत्त्वाची आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती आजारातून जात असते तेव्हा ते आणखी आवश्यक असतं. नियमितपणे व्यायाम केल्यानं केवळ शारीरिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होत नाही तर त्यानं आपलं मानसिक आरोग्य देखील सुधारतं. निरोगी मन असणं खूप महत्वाचं आहे."
advertisement
हिनाने पुढे लिहिलं की, "माझी केमोथेरपी सुरू आहे आणि मला त्याच्या न्यूरोपॅथिक वेदनाही सुरू झाल्या आहेत. माझे पाय सुन्न होतात. काहीवेळा मी माझं नियंत्रणही गमावतं. जिममध्ये पाय उचलता न आल्यानं खाली देखील पडते. पण तरीही मी स्वत:ला उचलते, ढकलते आणि लढत आहे." असं हिना खान म्हणाली आहे. आता हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 09, 2024 7:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Hina Khan : 'पाय सुन्न पडले तरी...' कॅन्सरशी झुंज, आजारपणातही हिना खानने सोडलं नाही हे काम; तुम्ही कराल कौतुक








