दशावतार : कलेचा, भक्तीचा आणि परंपरेचा उत्सव असणारा 'दशावतार' हा चित्रपट आहे. साऊथचा टच असणारी ही भव्यदिव्य कलाकृती आहे. गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास या चित्रपटात करण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या निरनिराळ्या छटा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
advertisement
'भीती वाटत होती पण...' चिकनगुनियाच्या वेदना, 81 व्या वर्षी अॅक्शन सीन्स; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला कोकणातील तो थ्रील
बिन लग्नाची गोष्ट : प्रिया बापट आणि उमेश कामत या मराठी इंडस्ट्रीतील गोड जोडीचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवेल. आदित्य इंगळेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'बिग लग्नाची गोष्ट' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रिय-उमेशची जोडी तबब्ल 12 वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रिया-उमेशसह या चित्रपटात गिरिश ओक आणि निर्मिती सावंतदेखील झळकणार आहेत. मायेच्या माणसांवर प्रेम करायला लावणारा हा चित्रपट आहे.
आरपार : हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा चित्रपट आहे. तरुणांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. विशेष म्हणजे हृता आणि ललितच्या वाढदिवशी 12 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. प्रेमात वेड लावायची ताकद असते, हे सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ गाणी आहेत. ऋषी मनोहरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गेले काही दिवस या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं आहे.