तुमच्या कारमध्ये कितीही हायटेक फिचर्स असेल तरही गाडी होते हॅक, मग काय करावं?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला आहे. पूर्वी चावी तोडून किंवा लॉक फोडून गाडी चोरण्याच्या घटना घडत असत.
छत्रपती संभाजीनगर : चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला आहे. पूर्वी चावी तोडून किंवा लॉक फोडून गाडी चोरण्याच्या घटना घडत असत. मात्र आता स्मार्ट फिचर्स असलेल्या आधुनिक कारमध्ये पारंपरिक पद्धतीने चोरी करणे अवघड झाले आहे. तरीही चोरटेही तितकेच तंत्रज्ञानसज्ज झाले असून, सिस्टीम हॅक करून महागड्या गाड्या लंपास करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत.
आजच्या कारमध्ये कीलेस एंट्री, पुश बटण स्टार्ट, जीपीएस ट्रॅकिंग, अलार्म सिस्टीम, स्टिअरिंग लॉक अशा अत्याधुनिक सुविधा असतात. चावी किंवा अधिकृत सिग्नलशिवाय गाडी सुरू होत नाही. पण हायटेक उपकरणांच्या मदतीने चोरटे या सुरक्षाव्यवस्थेलाच लक्ष्य करतात. विशेष किट, ओबीडी डिव्हाइस आणि रिलेबॉक्ससारख्या साधनांचा वापर करून कारच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये प्रवेश केला जातो. इंजिन कोड स्कॅन करून बनावट चावी तयार केली जाते आणि काही मिनिटांत गाडी सुरू केली जाते.
advertisement
कार पार्क करताना काय काळजी घ्याल?
कारमध्ये अद्ययावत जीपीएस ट्रॅकर बसवा, कंपनीचे अधिकृत सूचना देणारे सिक्युरिटी अॅप मोबाइलमध्ये वापरा, कार पार्क करताना नेहमी उजेडात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीत पार्क करावी, कारमध्ये अतिरिक्त चावी कधीही ठेवू नका, शक्य असल्यास स्टिअरिंग लॉक किंवा व्हील लॉक वापरा, स्मार्ट की घराच्या दरवाजाजवळ ठेवू नका, स्मार्ट कीसाठी सिग्नल रोखणारे कव्हर वापरा, ओबीडी पोर्टसाठी लॉक कव्हर बसवा, कारचे दरवाजे लॉक आहेत का? याबाबतची दोनवेळा खात्री करून घेणे कारमालकांची जबाबदारी आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 10:30 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
तुमच्या कारमध्ये कितीही हायटेक फिचर्स असेल तरही गाडी होते हॅक, मग काय करावं?









