SA vs NZ Semifinal : साऊथ अफ्रिका घेणार एबी डिव्हिलियर्सच्या अश्रूंचा बदला! तब्बल 11 वर्षानंतर चालून आली संधी, 2015 ला काय झालं होतं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
SA vs NZ Semifinal Proteas Will Take revenge : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना न्यूझीलंडशी झाला तेव्हा साऊथ अफ्रिकेला हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला होता.
SA vs NZ Semifinal : 24 मार्च 2015... एखादा कट्टर क्रिकेटप्रेमी ही तारीख कधीच विसरू शकत नाही. आयसीसी वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात रोमांचक मॅच कोणत्या? असा सवाल विचारला तर दोन मॅच सर्वांच्या नजरेखालून जातील. एक म्हणजे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील फायनल 2019 ची फायनल आणि दुसरी म्हणजे 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमधील साऊथ अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनल... एबी डिव्हिलियर्स, मोर्ने मॉर्कल, इम्रान ताहीर, क्विंटन डी कॉक अन् डेल स्टेन यांचे अश्रू मैदानावर पावसासारखे ढळले होते, तोच दिवस म्हणजे 24 मार्च 2015... अशातच आता 11 वर्षानंतर साऊथ अफ्रिकाकडे मोठी संधी चालून आली आहे.
Two world-class teams aiming for a spot in a #T20WorldCup Final
Tournament broadcast details https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/iCwf9xn1RT
— ICC (@ICC) March 4, 2026
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना न्यूझीलंडशी झाला तेव्हा साऊथ अफ्रिकेला हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला होता. ही तीच मॅच होती, ज्यानंतर एबी डिव्हिलियर्ससह साऊथ अफ्रिकेचे सगळेच रडले होते. ऑकलँडमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने साऊथ अफ्रिकेचा पराभव करत फायनल गाठली होती. रोमांचक झालेल्या या सामन्यात पराभवानंतर साऊथ अफ्रिकेचे सर्वच्या सर्व खेळाडू मैदानातच ढसाढसा रडले होते. तो हाच काळ होता जेव्हा साऊथ अफ्रिकेची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये होती.
advertisement
हाशीम आमला, क्विंटन डी कॉक, डीव्हिलियर्स, फाफ डु प्लेसिस, डेल स्टेन यांच्यासारख्या तगड्या खेळाडूंची ही टीम आता उरली नाही. पण नव्या दमाच्या खेळाडूंसह साऊथ अफ्रिका 11 वर्षानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या नॉक आऊट स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे 2015 ची जखम भरून काढण्याची मोठी संधी आहे. आज कोलकाताच्या इडन गार्डनवर दोन्ही संघात सामना रंगणार आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
दरम्यान, अॅडन मार्करम, क्विंटन डी कॉक, रायन रिकलटन आणि डेव्हिड ब्रेविस यांच्यासारख्या खेळाडूंच्या खांद्यावर आज साऊथ अफ्रिकेची जबाबदारी असेल. तर बॉश, मार्को यान्सन, केशव महाराज, लुंगी एन्गेडी यांच्या खांद्यावर बॉलिंगची जबाबदारी असेल तर मार्करम प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 10:05 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SA vs NZ Semifinal : साऊथ अफ्रिका घेणार एबी डिव्हिलियर्सच्या अश्रूंचा बदला! तब्बल 11 वर्षानंतर चालून आली संधी, 2015 ला काय झालं होतं?








