advertisement

स्त्रीबीज प्रकरणात मोठी कारवाई, नाशिकमधून नामांकित डॉक्टरला बेड्या; स्त्रीबीजांची आंतरराष्ट्रीय तस्करी?

Last Updated:

बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरणात डॉ. अमोल पाटील यांना अटक झाली आहे. नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरवर तपास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या रॅकेटचे धागेदोरे असल्याचा संशय आहे.

News18
News18
नाशिक, प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ: बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करी सुरू होती, त्याचे धागेदोरे नाशिकपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता मोठी कारवाई करत डॉ. अमोल पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे सरोगसी आणि आयव्हीएफ क्षेत्रातील काळ्या बाजाराचा पर्दाफाश झाला आहे.
डॉ. अमोल पाटील हे सरोगेट मदर आणि स्त्रीबीज मिळवून देणारे एजंट म्हणून काम करत असल्याचा प्राथमिक आरोप त्यांच्यावर आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट बदलापूर इथून चालवलं जात होतं. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे स्त्रीबीज अवैध मार्गाने विकले जात असल्याचा संशय आहे.
गरजू महिलांना मोठ्या रकमेचं आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढले जात होतं. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने सुलक्षणा गाडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयित एजंट्सची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. हे रॅकेट केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरते मर्यादित नसून, याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले असण्याचा संशय आहे. परदेशातील ग्राहकांना ही स्त्रीबीजे लाखो रुपयांना विकली जात असावीत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणात डॉ. अमोल पाटील यांच्या अटकेनंतर नाशिकमधील त्यांच्या मालती आयव्हीएफ सेंटरवर आता टांगती तलवार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या केंद्रातील सर्व कागदपत्रे, रुग्णांच्या नोंदी आणि स्त्रीबीज संकलनाची प्रक्रिया कायदेशीर आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्त्रीबीज प्रकरणात मोठी कारवाई, नाशिकमधून नामांकित डॉक्टरला बेड्या; स्त्रीबीजांची आंतरराष्ट्रीय तस्करी?
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement