Stock Market Holiday: 4 मार्चला होळीमुळे स्टॉक मार्केट बंद राहणार की सुरू? BSE-NSE ने दिली अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
होळीच्या निमित्ताने शेअर बाजार ३ मार्चला बंद होता. आज ४ मार्च रोजी बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहील. २०२६ मध्ये शेअर बाजार १५ दिवस बंद राहणार आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
आज ४ मार्च, देशभरात होळीचा उत्साह असला तरी शेअर बाजारात मात्र आज व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आज सुट्टी आहे का? असा प्रश्न होता, मात्र नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, होळीनिमित्तची सुट्टी कधी दिली याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शेअर बाजारात सध्या मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवारी बाजार १ टक्क्यांहून अधिक घसरला होता. ऑटो, रिअल्टी आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी कमजोरी दिसून आली. मिडिल ईस्ट मधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. तेल महाग झाल्यामुळे महागाई वाढण्याचा धोका असतो, ज्याचा थेट परिणाम बाजारावर होतो.
advertisement







