गोरेगाव ते सीएसएमटी प्रवास होणार ‘गारेगार’, लवकरचं सुरू होणार AC लोकल, असा आहे प्लॅन
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हार्बर मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आली असून, नवीन एसी रेक उपलब्ध झाल्यानंतर ती या मार्गावर धाववण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई : गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. आता या मार्गावर आता अधिक आरामदायी आणि आधुनिक सुविधांनी सज्ज अशा सेवेची भर पडणार आहे. हार्बर मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आली असून, नवीन एसी रेक उपलब्ध झाल्यानंतर ती या मार्गावर धाववण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हार्बर मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आली असून, नवीन एसी रेक उपलब्ध झाल्यानंतर ती या मार्गावर धाववण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सध्याची सेवा आणि प्रस्तावित बदल
गोरेगाव–सीएसएमटी हार्बर मार्गावर सध्या दोन्ही दिशांना मिळून दररोज सुमारे 106 फेऱ्या धावतात. या सेवेसाठी मध्य रेल्वेचे 5 ते 6 रेक आणि पश्चिम रेल्वेचे 2 रेक वापरले जातात. प्रत्येक रेक साधारण 12 फेऱ्या पूर्ण करतो. प्रस्तावानुसार, सध्या चालणाऱ्या सामान्य लोकलपैकी एक रेक काढून त्याऐवजी एसी लोकल चालविण्याचा विचार आहे.
advertisement
अंतर आणि संभाव्य परिणाम
सीएसएमटी ते गोरेगाव हा सुमारे 34 ते 36 किलोमीटरचा प्रवास आहे. सध्या या मार्गावर साधारण 45 मिनिटांच्या अंतराने लोकल उपलब्ध होते. मात्र, एका सामान्य फेरीऐवजी एसी सेवा आल्यास काही वेळा साधारण लोकलची प्रतीक्षा वाढून ती दीड तासांपर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत याचा परिणाम प्रवाशांवर होऊ शकतो.
advertisement
तांत्रिक बाबी आणि प्रवासी अनुभव
पनवेल–सीएसएमटी मार्गावरील एसी लोकलमध्ये दरवाजे पूर्णपणे बंद झाल्यानंतरच गाडी सुटत असल्याने थोडा अतिरिक्त वेळ लागतो, अशा तक्रारी आधी समोर आल्या आहेत. गोरेगाव मार्गावरही अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
रेल्वे प्रशासन प्रवासी प्रतिसाद, उपलब्ध रेक, तांत्रिक क्षमता आणि वेळापत्रकातील बदल यांचा सखोल अभ्यास करूनच अंतिम प्रस्ताव सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरामदायी आणि थंडावा देणारी एसी सेवा उपलब्ध झाल्यास नियमित नोकरदार वर्ग आणि लांब पल्ल्याचे प्रवासी यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गर्दीच्या प्रवासात आरामाचा पर्याय मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
advertisement
हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्यास प्रवाशांना आराम आणि वेळेचे संतुलन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आता अंतिम मंजुरीनंतरच या सेवेसंदर्भातील स्पष्ट चित्र समोर येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 7:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
गोरेगाव ते सीएसएमटी प्रवास होणार ‘गारेगार’, लवकरचं सुरू होणार AC लोकल, असा आहे प्लॅन









