advertisement

Iran New Supreme Leader: इराणच्या नव्या 'बॉस'ची निवड, खामेनींच्या मुलाकडे सत्तेची सूत्र, पडद्यामागे मोठ्या घडामोडी...

Last Updated:

Iran New Supreme Leader: इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजकीय वारसाची निवड झाली आहे.

इराणच्या नव्या 'बॉस'ची निवड, खामेनींच्या मुलाकडे सत्तेची सूत्र, पडद्यामागे मोठ्या घडामोडी...
इराणच्या नव्या 'बॉस'ची निवड, खामेनींच्या मुलाकडे सत्तेची सूत्र, पडद्यामागे मोठ्या घडामोडी...
तेहरान:अमेरिका आणि इस्रायलकडून बॉम्बवर्षाव सुरू असताना दुसरीकडे इराणमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहे. इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजकीय वारसाची निवड झाली आहे. खामेंनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांना देशाचा पुढील सर्वोच्च नेता म्हणून निवडण्यात आले आहे. इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
इराणचे मृत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र मोजतबा खमेनी यांची देशाचे पुढचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली आहे. इराणच्या सर्वोच्च असेंबली ऑफ एक्सपर्टने मोज्तबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 'इराण इंटरनॅशनल'ने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या तीव्र दबावाखाली हा निर्णय घेतला आहे. मोज्तबा यांचे वडील, माजी सर्वोच्च नेते अली खमेनी यांची तेहरानवर अमेरिका आणि इस्रायली हल्ल्याच्या आदल्या दिवशी शनिवारी हत्या करण्यात आली.
advertisement

कोण आहेत मोजतबा खामेनी?

५६ वर्षीय मोजतबा खामेनी हे दिवंगत अली खामेनी यांचे दुसरे चिरंजीव आहेत. जरी ते मध्यम-स्तरीय शिया धर्मगुरू असले, तरी इराणच्या प्रशासकीय आणि लष्करी वर्तुळात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्या वडिलांच्या कार्यालयाचे (बेट-ए-राहबारी) कामकाज पाहत होते आणि सत्तेच्या अंतर्गत वर्तुळात त्यांना आधीच 'संभाव्य वारस' म्हणून पाहिले जात होते.
advertisement
दरम्यान, इराणच्या अधिकृत सरकारी माध्यमांनी अद्याप या नियुक्तीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र, इस्रायलसोबत सुरू असलेल्या थेट युद्धजन्य परिस्थितीत, देशाचे नेतृत्व रिक्त राहू नये यासाठी तातडीने मोजतबा यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या सत्तापालटामुळे आता इराणचे इस्रायल आणि अमेरिकेप्रती असलेले धोरण अधिक आक्रमक होणार की संयमी, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran New Supreme Leader: इराणच्या नव्या 'बॉस'ची निवड, खामेनींच्या मुलाकडे सत्तेची सूत्र, पडद्यामागे मोठ्या घडामोडी...
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement