आधी लग्न मोडलं, नंतर ब्रेकअपही झालं! वयाच्या 42 व्या वर्षीही सिंगल; अभिनेत्रीमुळे आता सुपरस्टारच्या संसारात वादळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actress : टॉपची ही अभिनेत्री जिच्या सौंदर्यावर कित्येक जण फिदा आहेत. पडद्यावर कित्येक वर्षे तिने राज्य केलं पण खऱ्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत तिने अनेक चढउतार पाहिले. कधी लग्न मोडल्यामुळे तर कधी ब्रेकअपमुळे चर्चेत राहिलेली ही अभिनेत्री आता एका अभिनेत्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे.
चाहत्यांना सेलिब्रिटींच्या करिअरपेक्षा त्यांच्या लग्नात आणि वैयक्तिक आयुष्यात जास्त रस असतो. अशीच एक अभिनेत्री जी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला होता तो मोडला, ही अभिनेत्री प्रेमात पडली तिचा प्रेमभंग झाला. आता ही अभिनेत्री 42 वर्षांची आहे. वयाच्या 42 व्या वर्षीही ती सिंगल आहे आणि आता तिच्यामुळे एका सुपरस्टारच्या संसारात वादळ आलं आहे.
advertisement
advertisement
या अभिनेत्रीने अनेक ब्लॉकबस्टर फिल्म्स दिल्यात. आजही तिची मागणी इतकी आहे की ती एका चित्रपटासाठी तब्बल 3 कोटी रुपये घेते. फक्त चित्रपटांमधूनच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटद्वारे ती दरवर्षी सुमारे 9 कोटी रुपये कमावते. तिचं हैदराबादमध्ये 6 कोटी आणि चेन्नईमध्ये 10 कोटींचं आलिशान घर आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये करोडो किमतीच्या चार आलिशान गाड्या देखील आहेत. यावरूनच तिच्या लक्झरी लाइफस्टाईलचा अंदाज लावता येतो.
advertisement
2015 मध्ये जेव्हा ही अभिनेत्री तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती, तेव्हा तिने चेन्नईतील बिझनेसमन वरुण मनियनशी साखरपुडा करून सगळ्यांना धक्का दिला. लोकांना तिच्या लग्नाची प्रतीक्षा होती. पण अवघ्या 5 महिन्यांनंतर तिने अचानक तिचं लग्न मोडलं. 2017 च्या मुलाखतीतही तिने यावर भाष्य केलं होतं. पण यामागील कारण तिने कधीही उघड केलं नाही.
advertisement
राणा दग्गुबातीशी तिचं नाव वारंवार जोडलं गेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रेमाच्या अफवा पसरत होत्या. ते अनेकदा पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यावेळी दोघांनीही याची पुष्टी केली नसली तरी, राणाने स्वतः 2018 मध्ये 'कॉफी विथ करण' मध्ये ते दोघं काही काळ एकमेकांना डेट करत असल्याचं कबूल केलं होतं. पण नंतर ते वेगळं झाल्याचं त्याने सांगितलं. ब्रेकअपचं कारण त्यानेही सांगितलं नाही. नंतर राणाने 2020 मध्ये मिहिका बजाजशी लग्न केलं.
advertisement
पण राणाची ती अभिनेत्री गर्लफ्रेंड अजूनही सिंगल आहे. तिने स्वतःच्या अटींवर जीवन जगणं आणि कामावर लक्ष केंद्रीत केलं. तिने नेहमीच तिच्या लग्नापेक्षा तिच्या करिअरला प्राधान्य दिलं आहे. ती म्हणाली, ती लग्नावर विश्वास ठेवते, पण फक्त सामाजिक दबाव किंवा वाढत्या वयामुळे लग्न करायला हवं हे तिला मान्य नाही. याला ती महत्त्व देत नाही. तिच्या मते लग्न फक्त खरं प्रेम आणि जोडीदाराशी चांगली बाँडिंग असेल तरच व्हायला हवं.
advertisement
advertisement
advertisement







