Weather Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचं संकट, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
विदर्भातील अकोल्यात 38 अंशांपर्यंत तापमान नोंदवले गेले असून, तीव्र उन्हाचा तडाखा आजही जाणवेल. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पूर्वसूचनांमुळे सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 4 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. विदर्भातील अकोल्यात 38 अंशांपर्यंत तापमान नोंदवले गेले असून, तीव्र उन्हाचा तडाखा आजही जाणवेल. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पूर्वसूचनांमुळे सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
advertisement
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 33-37 अंश सेल्सियस, किमान 22-22 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








