'आता मला हे नकोच', कठोर प्रयत्न करूनही मराठमोळ्या अभिनेत्रीची कूस रिकामीच! रागाच्या भरात घेतला मोठा निर्णय
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Neha Pendse on Motherhood: नेहाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः मातृत्व आणि फॅमिली प्लॅनिंगबद्दल जे भाष्य केलंय, ते ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
advertisement
advertisement
राजश्री मराठीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत नेहाने आपल्या मनातील कोपरा मोकळा केला. ती म्हणाली, "मला आता मूल नकोय. हा निर्णय मी एका रात्रीत घेतलेला नाही. लग्नानंतर एका विशिष्ट टप्प्यावर मला आई होण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी मी खूप प्रयत्नही केले, पण दुर्दैवाने यश मिळालं नाही. त्या काळात मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते, प्रचंड निराश झाले होते."
advertisement
advertisement
advertisement
२०२० मध्ये नेहाने व्यावसायिक शार्दुल बायससोबत लग्नगाठ बांधली. शार्दुलचं हे तिसरं लग्न होतं आणि त्याच्या आधीच्या दोन लग्नांपासून त्याला दोन मुली आहेत. नेहाचं तिच्या दोन्ही सावत्र लेकींसोबत अतिशय प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं आहे. कदाचित या मुलींच्या रूपात तिला तिचं मातृत्वाचं सुख मिळालं असावं, असंही चाहत्यांना वाटतंय.
advertisement






