advertisement

T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा धमाका... पहिला सामना अन् फायनल कुठे? ना मुंबई ना अहमदाबाद!

Last Updated:

भारतामध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे, वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होणार आहे.

T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा धमाका... पहिला सामना अन् फायनल कुठे? ना मुंबई ना अहमदाबाद!
T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा धमाका... पहिला सामना अन् फायनल कुठे? ना मुंबई ना अहमदाबाद!
मुंबई : भारतामध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे, वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचं वेळापत्रक 6 किंवा 7 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी टी-20 वर्ल्ड कपनंतर आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होईल, असं सांगण्यात येत होतं, पण आता बीसीसीआय आधीच आयपीएल वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं वृत्त आहे.
यंदाच्या आयपीएलचं वेळापत्रक हे दोन टप्प्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक मंजूर केलं आहे. हे वेळापत्रक 6 किंवा 7 मार्चला जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पहिला सामना गतविजेत्या टीमच्या होम ग्राउंडवर खेळला जातो, त्यामुळे यंदा आयपीएलचा पहिला सामना आरसीबीचं होम ग्राउंड असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
advertisement
आरसीबी फ्रँचायझीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आरसीबी त्यांच्या पाच होम मॅच चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळेल. आयपीएल 2026 च्या प्लेऑफ मॅचपैकी एक आणि फायनल देखील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाणार असल्याचे वृत्त आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम 28 किंवा 29 मार्च रोजी सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि फायनल 31 मे रोजी होणार आहे.
advertisement
भारतामध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर परदेशी खेळाडूंची एनओसी टीमसोबत शेअर केली जाईल, त्यानंतर पुढच्या आठवड्यात सर्व फ्रँचायझींना सराव सत्रांची माहिती दिली जाईल.
तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आयपीएल 2026 चे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले जाणार असल्याचे वृत्त आहे. निवडणुकीच्या दिवशी या तीन राज्यांमध्ये आयपीएल सामने आयोजित करणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असुरक्षित ठरेल. त्यामुळे, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच बीसीसीआय दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करू शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा धमाका... पहिला सामना अन् फायनल कुठे? ना मुंबई ना अहमदाबाद!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement