TRENDING:

लग्नानंतर सुखी संसारात रमली मोनालिसा भोसले, 'धुरंधर'च्या गाण्यावर फरमानसोबत झाली रोमँटिक, VIDEO VIRAL

Last Updated:

Monalisa Bhosle: धमक्या, समाजाचा विरोध आणि आरोप बाजूला सारून मोनालिसा सध्या आपल्या संसारात खुश आहे. मोनालिसाने लग्नानंतर पहिल्यांदाच फरमानसोबत एक रोमँटिक व्हिडीओ रील शेअर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गेल्या वर्षी महाकुंभमेळ्यातून रातोरात प्रसिद्धीझोतात आलेली मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. घरच्यांचा विरोध पत्करून, समाजाची पर्वा न करता मोनालिसाने आपला प्रियकर फरमान खान याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, या लग्नानंतर एकच गदारोळ झाला. अनेकांनी या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत, फरमानने मोनालिसाला भुलवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप केला. अशातच फरमान आणि मोनालिसाने पत्रकार परिषद घेत सर्वांच्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली.
News18
News18
advertisement

मोनालिसाने पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार, फरमान आणि तिची भेट फेसबुकवर झाली. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांचा कडाडून विरोध होता. मोनालिसाच्या घरचे तिच्यावर दुसऱ्या मुलाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते.

विरोध पत्करून मोनालिसा-फरमानने बांधली लग्नगाठ

अशा परिस्थितीत मोनालिसाने थेट तिरुवनंतपुरममधील थंपानूर पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली. पोलीस प्रोटेक्शन मिळाल्यानंतर तिने एका मंदिरात फरमानशी लग्नगाठ बांधली. मात्र, यानंतर दोघांनाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

advertisement

लग्नानंतर मोनालिसा रमली संसारात

दरम्यान, धमक्या, समाजाचा विरोध आणि आरोप बाजूला सारून मोनालिसा सध्या आपल्या संसारात खूश आहे. मोनालिसाने लग्नानंतर पहिल्यांदाच फरमानसोबत एक रोमँटिक व्हिडिओ रील शेअर केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

मोनालिसाने शेअर केलेल्या रीलमध्ये ती फरमानसोबत एका बागेत वेळ घालवताना दिसत आहे. या रीलवर धुरंधर फिल्ममधील गहरा हुआ हे गाणे सुरू असून त्यावर मोनालिसा आणि फरमान रोमँटिक झाले आहेत. मोनालिसा पुढे धावत आहे आणि फरमान तिचा पाठलाग करत आहे. यानंतर फरमान मोनालिसाला उचलतो आणि तिला घेऊन एक गिरकी मारतो. त्यांचा हा व्हिडिओ खूपच क्यूट वाटतोय. यावेळी मोनालिसा मनसोक्त हसताना आणि बागडताना दिसत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्नानंतर सुखी संसारात रमली मोनालिसा भोसले, 'धुरंधर'च्या गाण्यावर फरमानसोबत झाली रोमँटिक, VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल