अलिकडेच मृणालचा एक व्हिडिओ समोर ज्यामध्ये ती रजनीकांतचा एक्स जावई सुपरस्टार धनुषसोबत गप्पा मारताना दिसली. दोघेही एकमेकांचे हात धरून होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चर्चा सुरू झाली की मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत आहेत. अखेर तिने या प्रकरणावरील मौन सोडलं असून त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
( मराठमोळ्या अभिनेत्याला Bigg Boss 19ची ऑफर, सलमानच्या शोमध्ये जाणार का? म्हणाला, 'मी या शोचा...')
advertisement
मृणाल-धनुषच्या नात्याचे सत्य काय आहे?
गेल्या अनेक दिवसांपासून मृणाल ठाकूर आणि धनुषबद्दल चर्चा सुरू आहेत. पण या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. अफवांवर प्रतिक्रिया देताना मृणाल हसायला लागली. धनुष आणि तिच्यामध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही नाही असं तिनं सांगितलं.
मृणाल म्हणाली, 'धनुष हा माझा फक्त एक चांगला मित्र आहे. मला माहिती आहे की आम्ही दोघं एकत्र असल्याच्या अनेक बातम्या पसरवल्या जात आहेत. मी जेव्हा त्या पाहिल्या तेव्हा मला खूप फनी वाटलं."
मृणालनं या 'सन ऑफ सरदार 2' च्या स्क्रीनिंगमध्ये धनुषच्या उपस्थितीबद्दलही सांगितलं. ती म्हणाली "धनुष सन ऑफ सरदार 2 च्या कार्यक्रमाला पोहोचला होता. कोणीही याचा गैरसमज करू नये. अजय देवगणनेच धनुषला इनव्हाइट केलं होतं".
डेटिंगची चर्चा कशी सुरू झाली
धनुष आणि आनंद एल राय यांच्या आगामी 'तेरे इश्क में' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत मृणाल दिसली तेव्हा या अफवा सुरू झाल्या. त्यानंतर धनुष 'सन ऑफ सरदार 2' च्या स्क्रीनिंगला पोहोचला. जिथे तो मृणाल ठाकूरचा हात धरून बोलत होताना दिसला आणि त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच मृणालने इंस्टाग्रामवर धनुषच्या बहिणींना फॉलो करायला सुरुवात केली त्यामुळे या चर्चांना आणखी दुजोरा मिळाला.