जुहूतील त्यांचा सुप्रसिद्ध बंगला ‘प्रतीक्षा’ पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यापासून ते बंगल्याच्या आतपर्यंत पाणी शिरलेले दिसत आहे. त्यामुळे मोठमोठ्या व्यक्तींना, श्रीमंतांनाही मुंबईसाचा पावसाळा सोडत नाही, असं चित्र दिसतंय.
'पॅंट घालायचा त्रास होतो..' अमिताभ बच्चनवर कठीण वेळ, असं का म्हणाले महानायक?
व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती म्हणतो, "कितीही पैसे असले, कितीही कोटींची मालमत्ता असली तरी मुंबईच्या पावसापुढे सगळे हतबल आहेत. ना अंबानी वाचले, ना अमिताभ बच्चन!" याहून धक्कादायक म्हणजे, या व्हिडिओमध्ये असा दावा केला गेला की बिग बी स्वतः पाणी काढण्यासाठी वायपर हातात घेऊन बाहेर आले होते! अर्थात, हा किस्सा कितपत खरं आहे हे स्पष्ट नाही. पण सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा र
advertisement
अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’च्या अफाट यशानंतर 1976 मध्ये हा बंगला खरेदी केला होता. त्यावेळी किंमत जास्त नव्हती, पण आज या घराची किंमत तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.गली आहे. इथेच त्यांची दोन्ही मुलं श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा जन्म झाला होता. कवी हरिवंश राय बच्चन यांनीच या घराला ‘प्रतीक्षा’ हे नाव दिलं होतं.
सुरुवातीला अमिताभ, त्यांच्या आई-वडिलांसोबत याच बंगल्यात राहत होते. मात्र नंतर कुटुंब शेजारील दुसऱ्या बंगल्यात ‘जलसा’ येथे राहायला गेले. तरीही ‘प्रतीक्षा’ आजही चाहत्यांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे.
मुंबईतला पाऊस हा श्रीमंत-गरीब असा भेद करत नाही. लोकांचे घरं, गाड्या, रस्ते पाण्यात बुडतात, तसेच सेलिब्रिटींच्या आलिशान बंगल्यांनाही यातून सुटका नाही. आणि म्हणूनच बिग बींचा प्रतीक्षा बंगला पाण्यात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक म्हणू लागले,"मुंबईत पाऊस पडला की सगळेच समान होतात"