TRENDING:

OTT Must Watch : 'महाराजा' आणि 'दृश्यम' विसराल! फक्त 7 कोटींत बनला हा साऊथ थ्रिलर सिनेमा; क्लायमॅक्स पाहून डोकं सुन्न होईल

Last Updated:

OTT Must Watch : हल्ली लोक अशा सिनेमांच्या शोधात असतात की ज्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, मेंदूला काम करावं लागेल आणि शेवट सुन्न करुन सोडल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टी सध्या जगभरात आपल्या दर्जेदार कथांमुळे ओळखली जाते. विजय सेतुपतीचा 'महाराजा' असो किंवा मोहनलाल यांचा 'दृश्यम', या चित्रपटांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले. लोकांना हल्ली असे सिनेमा पाहायला आवडतात. लोक अशा सिनेमांच्या शोधात असतात की ज्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, मेंदूला काम करावं लागेल आणि शेवट सुन्न करुन सोडल.
Ratsasan सिनेमामधील एक सीन
Ratsasan सिनेमामधील एक सीन
advertisement

2018 मध्ये एक असा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने सस्पेन्सच्या बाबतीत या सर्व सिनेमांना तगडी टक्कर दिली आहे. जेव्हा हा चित्रपट चित्रपटगृहात आला, तेव्हा प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले होते आणि आता हा सिनेमा ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची चर्चा आजही 'बेस्ट क्राईम थ्रिलर' म्हणून केली जाते.

या चित्रपटाची कथा 'अरुण' नावाच्या तरुणाभोवती फिरते. अरुणला एक चित्रपट दिग्दर्शक बनायचे असते, त्यासाठी तो सायको किलर्सवर प्रचंड अभ्यास करतो. मात्र, वडिलांच्या निधनानंतर परिस्थितीमुळे त्याला पोलीस ऑफिसरची नोकरी स्वीकारावी लागते. पण नशिबाचा खेळ बघा, ज्या सायको किलर्सचा त्याने केवळ सिनेमासाठी अभ्यास केला होता, तसाच एक क्रूर खुनी शहरात धुमाकूळ घालू लागतो.

advertisement

हा सायको किलर शाळकरी मुलींना आपले टार्गेट बनवतो आणि त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करतो. पोलीस यंत्रणा हतबल झालेली असताना, अरुण आपल्या 'फिल्ममेकर'च्या बुद्धीचा वापर करून त्या खुन्याचा माग काढण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसतसा सस्पेन्स वाढत जातो. आपण ज्याला खुनी समजतो, तो प्रत्यक्षात खुनी नसून खरा गुन्हेगार तर तुमच्या डोळ्यांसमोरच असतो, पण तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. आता तुमच्या मनात नाव जाणून घेण्यासाठी नक्कीच उत्सुकता वाढली असेल.

advertisement

या मास्टरपीस चित्रपटाचे नाव आहे 'रतसासन' (Ratsasan). राम कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता विष्णु विशाल याने मुख्य भूमिका साकारली आहे, तर अमला पॉल आणि सरवनन यांनी त्याला तोलामोलाची साथ दिली आहे.

का पाहावा?

या चित्रपटाचा 'बॅकराऊंड स्कोर' इतका भयानक आहे की तुम्हाला सतत भीती जाणवत राहील. चित्रपटाचा शेवट म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे. तो पाहिल्यानंतर तुमचे डोकं सुन्न होईल आणि तुम्ही विचार करत राहाल की असंही घडू शकतं?

advertisement

IMDb वर या चित्रपटाला 8.3 सारखे जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहानं मस्ट आहे.

विशेष म्हणजे, 'रतसासन' हा मोठ्या बजेटचा सिनेमा नव्हता. केवळ 7 कोटी रुपयांत बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 23 कोटींहून अधिक कमाई करून मेकर्सना मालामाल केले. पण बॉक्स ऑफिसपेक्षाही जास्त हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करून गेला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपये रोजंदारीवर केलं काम, महिलेनं उभारला आता व्यवसाय, 1 लाखाची उलाढाल
सर्व पहा

कुठे पाहाल? जर तुम्हाला हा थरार अनुभवायचा असेल, तर 'रतसासन' आता जिओ सिनेमा (JioCinema) आणि प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. विकेंडला घरबसल्या एक जबरदस्त थ्रिलर पाहायचा असेल, तर हा चित्रपट आजच लिस्टमध्ये ॲड करा.

मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Must Watch : 'महाराजा' आणि 'दृश्यम' विसराल! फक्त 7 कोटींत बनला हा साऊथ थ्रिलर सिनेमा; क्लायमॅक्स पाहून डोकं सुन्न होईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल