Success Story : शेतामध्ये 150 रुपये रोजंदारीवर केलं काम, महिलेनं उभारला आता व्यवसाय, आठवड्याला 1 लाखाची उलाढाल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतामध्ये 150 रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या भाग्यश्री लोंढे यांनी 2016 साली दहा हजार रुपयात स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
सोलापूर : केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे हे म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल. याचाच एक उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जहानपूर गावात राहणाऱ्या भाग्यश्री लोंढे होय. शेतामध्ये 150 रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या भाग्यश्री लोंढे यांनी 2016 साली दहा हजार रुपयात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. याच व्यवसायातून आज भाग्यश्री लोंढे सहा दिवसाला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. पाहुयात यशस्वी व्यावसायिक भाग्यश्री लोंढे यांची ही यशोगाथा.
बार्शी तालुक्यातील जहानपूर गावात राहणाऱ्या भाग्यश्री फुलचंद लोंढे शेतामध्ये दररोज 150 रुपये पगारीवर कामाला जात होत्या. 2016 साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि एक किलो काळा तिखट तयार करून जिजाऊ माता महिला स्वयंसाह्यता समूहाला सुरुवात केली. आज या व्यवसायाला जवळपास 9 वर्ष पूर्ण झाले असून या व्यवसायातून भाग्यश्री लोंढे या आठवड्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. तर खर्च वजा करून 20 हजार रुपयांचा नफा भाग्यश्री यांना मिळत आहे.
advertisement
जिजाऊ माता महिला स्वयंसाह्यतामध्ये शेंगा चटणी, जवस चटणी, शाबू बटाटा पापड, काळा तिखट, लसूण चटणी, तांदळाचे पापड, कोळीत पापड मिळत आहेत. तसेच कृषी प्रदर्शन, बचत गटाच्या माध्यमातून याची विक्री केली जाते. तर ऑनलाईन पद्धतीने जिजाऊ माता महिला स्वयंसाह्यता समूहाद्वारे याची विक्री केली जाते. एक किलो तिखट पासून सुरू केलेला या व्यवसायातून आज भाग्यश्री लोंढे 100 किलो तिखटची विक्री करत आहेत.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 11:01 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शेतामध्ये 150 रुपये रोजंदारीवर केलं काम, महिलेनं उभारला आता व्यवसाय, आठवड्याला 1 लाखाची उलाढाल








