बार्शी तालुक्यातील जहानपूर गावात राहणाऱ्या भाग्यश्री फुलचंद लोंढे शेतामध्ये दररोज 150 रुपये पगारीवर कामाला जात होत्या. 2016 साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि एक किलो काळा तिखट तयार करून जिजाऊ माता महिला स्वयंसाह्यता समूहाला सुरुवात केली. आज या व्यवसायाला जवळपास 9 वर्ष पूर्ण झाले असून या व्यवसायातून भाग्यश्री लोंढे या आठवड्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. तर खर्च वजा करून 20 हजार रुपयांचा नफा भाग्यश्री यांना मिळत आहे.
advertisement
Success Story: चार एकर, 3400 झाडे, पपईने केलं मालामाल; पहिल्याच वर्षी लाखोंचा नफा
जिजाऊ माता महिला स्वयंसाह्यतामध्ये शेंगा चटणी, जवस चटणी, शाबू बटाटा पापड, काळा तिखट, लसूण चटणी, तांदळाचे पापड, कोळीत पापड मिळत आहेत. तसेच कृषी प्रदर्शन, बचत गटाच्या माध्यमातून याची विक्री केली जाते. तर ऑनलाईन पद्धतीने जिजाऊ माता महिला स्वयंसाह्यता समूहाद्वारे याची विक्री केली जाते. एक किलो तिखट पासून सुरू केलेला या व्यवसायातून आज भाग्यश्री लोंढे 100 किलो तिखटची विक्री करत आहेत.