कशी झाली शॉर्ट फिल्मची निर्मिती?
नुकतेच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून 'चंद सांसें' या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं सर्व चित्रीकरण हे मराठवाड्यातील संभाजीनगर येथील एमजीएम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेलं आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती एमजीएम विद्यापीठामधील स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स आणि निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेली आहे. तर याचं दिग्दर्शन प्रतिभा जोशी यांनी केलेलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेमध्ये मोहन आगाशे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हे आहेत. तर मिलिंद जोग यांनी हा संपूर्ण चित्रपट चित्रित केलेला आहे.
advertisement
वजन वाढल्याने सुरू केला व्यायाम, आता जग जिंकतोय महाराष्ट्राचा आयर्नमॅन
एमजीएम परिसरात झालं शूटिंग
विशेष म्हणजे या सर्व शॉर्ट फिल्मचं शूटिंग एमजीएममधील हॉस्पिटल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये झाले. तर कॉस्च्युम, मेकअप, हेअर हे सर्व इथल्या विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाईन केलेलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सर्व कामे येथील विद्यार्थ्यांनीच केलेली आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात चित्रीत झालेल्या एखाद्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार भेटला ही सर्वांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे येथील विद्यार्थी आणि प्राचार्य सांगतात.
सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली
चंद सांसें या फिल्मचं आम्ही पहिल्या लॉकडाऊननंतर आणि दुसरे लॉकडाऊन लागायच्या आधीच चित्रीकरण केलं. यातली सर्व कामे आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आमच्या ध्यानीमनी सुद्धा नसताना या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार भेटल्याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे, असं प्राचार्य शिव कदम सांगतात.
महाराष्ट्राच्या पोलिसाचा नादच खुळा; थेट युरोप गाजवलं
आमच्यासाठी अभिमानाची बाब
मी फर्स्ट इयरला असताना मला ही शॉर्ट फिल्म करायला मिळाली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. याच्यामध्ये सर्व मोठे मोठे कलाकार होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मला यामधून खूप काही शिकायला भेटलं. याला राष्ट्रीय पुरस्कार भेटला ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे विद्यार्थी स्वप्निल सरोदे म्हणतो. तर ही शॉर्ट फिल्म जरी असली तरी याच्यामध्ये आम्ही सर्व पिक्चर फिल्म साठी लागणाऱ्या गोष्टी वापरल्या आहेत. हे चित्रीकरण करत असताना आम्हाला वाटलंही नव्हतं की या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार भेटेल, असं महेश हरबक म्हणाला.