Inspirational Story : महाराष्ट्राच्या पोलिसाचा नादच खुळा; थेट युरोप गाजवलं

Last Updated:

जगभरातील अत्यंत कठिण मानली जाणारी स्पर्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सलग दुसऱ्यांदा जिंकलीय. पाहा आयर्नमॅनचा प्रवास..

+
Inspirational

Inspirational Story : महाराष्ट्राच्या पोलिसाचा नादच खुळा; थेट युरोप गाजवलं

छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट : जर इच्छाशक्ती असेल तर माणूस कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतो. असाच पराक्रम छत्रपती संभाजीनगर शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी केलेला आहे. त्यांनी युरोपमधील इस्टोनियामध्ये झालेली ट्रायथलॉन स्पर्धा वयाच्या 52 व्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केली आणि सलग दुसर्‍यांदा ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला. असा विक्रम नोंदविणारे ते भारतातील पहिलेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठरले आहेत. जगभरातील अत्यंत कठिण स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा समावेश आहे. अ‍ॅथलेटच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस पाहणारी ही स्पर्धा फार कमी स्पर्धक पूर्ण करू शकतात.
आवड जपली आणि इतिहास घडला
संदीप गुरमे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आहेत. संभाजीनगर शहरामध्ये पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासूनच पोहण्याची व व्यायामाची आवड होती. त्यांनी त्यांची हीच आवड जपली. तेव्हापासूनच पोहणे, व्यायाम करणे हे त्यांचं प्राधान्य राहिलं. आयर्नमॅन’ स्पर्धेसाठी त्यांनी मागील तीन वर्षांपासून तयारी चालविली होती. अखेर सलग दोनदा आयर्नमॅन बनण्याचा इतिहास त्यांनी घडवला आहे.
advertisement
सलग दुसऱ्यांदा गाजवलं युरोप
संदीप गुरमे हे अनेक वर्षांपासून या स्पर्धेची तयारी करत आहेत. मागील वर्षी सुद्धा त्यांनी या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला. युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे ही स्पर्धा पार पडली. 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.5 किलोमीटर धावणे या तीन क्रीडा प्रकारांत ही स्पर्धा झाली. साधारण 17 ते 18 अंश सेल्सियस तापमानात एकसलग ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. त्यामुळे ही स्पर्धा जगातील कठिणतम ट्रायथलॉन स्पर्धांपैकी एक समजली जाते. दोन वेळा आयर्नमॅन बनण्याचे यश संपादन करणारे देशातील पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठरले आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी आर्यनमॅन ही स्पर्धा दुसर्‍यांदा यशस्वीरित्या पार पाडली आहे.
advertisement
किमान एक तास स्वत:साठी द्यावा
या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा यश मिळवण्यात माझे कोच, पत्नी आणि आई वडिलांचा मोठा वाटा आहे. आमच्या पोलीस विभागात येणाऱ्या तरुणांनी रोज किमान एक तास तरी स्वत:साठी आणि व्यायामासाठी दिला पाहिजे. या क्षेत्रात फिटनेस अत्यंत गरजेची आहे. मी रोज नियमित व्यायाम करतो. त्यामुळे ही स्पर्धा जिंकल्याचा मला आनंद आहे, असे आयर्नमॅन संदीप गुरमे सांगतात.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Inspirational Story : महाराष्ट्राच्या पोलिसाचा नादच खुळा; थेट युरोप गाजवलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement