वजन वाढल्याने सुरू केला व्यायाम, आता जग जिंकतोय महाराष्ट्राचा आयर्नमॅन
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
नितीन घोरपडे यांनी वजन वाढल्याने व्यायाम सुरू केला. आता सलग सहा वेळा जागतिक आयर्नमॅन स्पर्धा जिंकलीय.
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट : कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मेहनतीची आणि संयमीची गरज असते. या गोष्टी जर तुमच्यात असेल तर नक्कीच यश भेटतं. असंच काहीसं छत्रपती संभाजीनगर मधील व्यावसायिक नितीन घोरपडे यांच्याबाबत घडलंय. त्यांनी वजन वाढलं म्हणून व्यायाम सुरू केला. पुढं व्यायामाची गोडी लागली आणि जागतिक स्तरावर सर्वात अवघड मानली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा सलग सहा वेळा जिंकली. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
वजन वाढलं म्हणून सुरू केला व्यायाम
मूळचे छत्रपती संभाजीनगर शहरांमधील नितीन घोरपडे हे व्यावसायिक आहेत. त्यांना पहिल्यापासूनच व्यायामाची आवड होती. मात्र मध्यंतरी त्यांचं वजन खूप वाढलं. त्यामुळे त्यांनी परत व्यायामाला सुरुवात केली. यामध्ये ते सायकलिंग वगैरे करत होते. हे करत असतानाच त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. पुढे जागतिक ट्रायथलॉन स्पर्धांमध्येही ते भाग घेऊ लागले.
advertisement
सलग सहावेळा आयर्नमॅन
नितीन घोरपडे यांनी सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी सलग सहा वेळा ही स्पर्धा जिंकली. यामध्ये त्यांनी चार फुल स्पर्धा व दोन हाफ आयर्न मॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. खूप मोठी मेहनत आणि जिद्दीच्या बळावरच ही स्पर्धा जिंकता येऊ शकते. त्यामुळे नितीन यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
advertisement
जगातील सर्वात अवघड स्पर्धा
आयर्नमॅन स्पर्धेमध्ये तीन खेळांचा समावेश असतो. तिच्यामध्ये स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग हे तीन क्रीडाप्रकार असतात. 17 तासाच्या आत ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यामध्ये स्विमिंग 3.8 किलोमीटर, रनिंग 180 किलोमीटर, सायकलिंग 42 किलोमीटर एवढे अंतर पार करायचे असते. ही स्पर्धा पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. आपल्या देशातील वातावरण आणि स्पर्धेच्या देशामधील वातावरण यामध्ये बराचसा फरक असतो. हवामानात बदल झाल्यामुळे अडचण येते. त्यामुळे ही स्पर्धा जगातील सर्वात अवघड मानली जाते.
advertisement
व्यायामामुळं मिळालं यश
माझं वजन खूप वाढलं होतं. त्यामुळं मध्यंतरी मी व्यायामाकडे आलो. दररोज व्यायाम करायला लागलो. यामध्ये मी सायकलिंग, धावणे आणि पोहणे या सगळ्या गोष्टी करत होतो. हे करत असतानाच स्पर्धेकडे वळलो. सातत्यपूर्ण व्यायाम आणि सरावामुळे सलग सहा वेळा आयर्नमॅन स्पर्धा जिंकली. याचा मला खूप खूप आनंद व अभिमान वाटत आहे, असे नितीन घोरपडे सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 16, 2023 10:23 AM IST