‘द फॅमिली मॅन’मधल्या श्रीकांत तिवारीची आठवण करून देणाऱ्या एका खास अंदाजात, मनोज बाजपेयी या वेळी पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर झेंडे बनले आहेत. ही कथा खरी घटना आणि थोडासा विनोद यांचा कॉम्बो आहे. प्रसिद्ध गुन्हेगार कार्ल भोजराज उर्फ चार्ल्स शोभराज याला पकडण्याच्या मोहिमेवर हा चित्रपट आधारलेला आहे.
बॉलिवूड ते बिझनेस क्वीन! शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती किती? कुठून कमावते इतका पैसा
advertisement
हा चित्रपट दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे. खरी प्रेरणा मात्र मुंबई पोलिसातील अधिकारी मधुकर झेंडे यांच्याकडून घेतली आहे. चार्ल्स शोभराजला त्यांनी एकदा नाही तर दोन वेळा अटक केली होती. इतकंच काय, अटकेनंतर गोवा ते मुंबई ट्रेन प्रवासादरम्यान झेंडेंनी चार्ल्सवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या शेजारी दोन पोलिससुद्धा बसवले होते हा किस्सा ऐकायलाच सिनेमॅटिक वाटतो पण तो खराच आहे. चित्रपटाचा टोन हलका ठेवण्यात आला आहे. झेंडेंभोवतीचं पथकही त्याच्यासारखंच वेगळं आणि थोडंसं ‘विचित्र’ आहे. प्रत्येक सहकाऱ्याचं एक अनोखं वैशिष्ट्य दाखवलं गेलं आहे. दुसरीकडे, चार्ल्सचे गुन्हे मात्र गंभीरच आहेत. त्यालाच ‘बिकिनी किलर’ हे नाव मिळालं होतं.
hindustantimes ने दिलेल्या रिव्ह्यूनुसार, अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर, मनोज बाजपेयी नेहमीप्रमाणेच आत्मविश्वासपूर्ण दिसतात. झेंडेची भूमिका ते स्टाईलने साकारतात. जिम सर्भ चार्ल्स शोभराजच्या भूमिकेत खूपच देखणे आणि थोडे धोकादायकही वाटतात. भालचंद्र कासम झेंडेंचा साथीदार म्हणून रंग भरतात, तर सचिन खेडेकर थोड्या वेळासाठी दिसूनही प्रभाव टाकतात.
जिथे चित्रपट थोडा अडखळतो, ते म्हणजे त्याची गती. सततचा पाठलाग थोड्या वेळानंतर थकवतो आणि प्रेक्षकाला “आता पुढे काय?” हा प्रश्न पडतो. काही सीन्स पूर्वानुमानित वाटतात. तरीही, हा चित्रपट हलका-फुलका थ्रिलर म्हणून बघता येतो. कथानकात थोडी पुनरावृत्ती असली तरी कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपट रंगतो. एकूणात तीन स्टार्स मिळवणारा हा सिनेमा प्रेक्षकांना विनोद आणि थ्रिलरचा मिश्र अनुभव देतो.
दरम्यान, Inspector Zende आज शुक्रवारी 1:30 वाजता रिलीज झाला. नेटफ्लिक्सवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.