जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये एखादी मोठी फिल्म फ्रँचायझी पाहण्याचा प्लॅन केला असेल, तर आताच पाहा. कारण, नेटफ्लिक्सने परवान्याची मुदत संपल्यामुळे आणि कंटेंट पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ही मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, उद्या सकाळी जेव्हा तुम्ही नेटफ्लिक्स लॉगिन कराल, तेव्हा कदाचित तुमचे आवडते कंटेंट तुम्हाला पाहता येणार नाहीत.
advertisement
नेटफ्लिक्स कोणकोणते सिनेमे आणि वेबशो हटवणार?
या यादीत हॉलिवूडचे असे काही सिनेमे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.
ऍक्शन आणि थ्रिलर: ऍक्वामन अँड द लॉस्ट किंगडम, बेबी ड्रायव्हर, कॅप्टन फिलिप्स, ब्लू बीटल, झिरो डार्क थर्टी, स्कार्फेस, ट्रेनिंग डे आणि द मार्टियन.
रोमान्स आणि कॉमेडी: क्रेझी रिच एशियन्स, डर्टी डान्सिंग, हाऊ टू बी सिंगल, रनअवे ब्राइड आणि कन्फेशन्स ऑफ अ शॉपाहोलिक.
कल्ट क्लासिक्स: टॅक्सी ड्रायव्हर, द मास्क, द गुनीज, घोस्ट आणि डोनी डार्को.
फक्त सिनेमेच नाही, तर नेटफ्लिक्सने अनेक लोकप्रिय सिरीजलाही रामराम ठोकला आहे. यामध्ये कुंग फू पांडा ची संपूर्ण फ्रँचायझी, द हँगओव्हर सिरीज, 'फिफ्टी शेड्स'ची बोल्ड ट्रायोलॉजी, मेझ रनर आणि टॉम्ब रेडर यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. तसेच, ज्या वेब सीरिजसाठी चाहते नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन घेतात, त्यातील प्रिझन ब्रेक, मिस्टर रोबोट, लॉस्ट, स्टार ट्रेक आणि हाऊस ऑफ लाईज यांसारखे पॉप्युलर शो आता प्रेक्षकांना या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाहीत.
नेटफ्लिक्स दरवर्षी आपल्या लायसन्सचे रिन्युअल करत असते. अनेकदा प्रोडक्शन हाऊसशी असलेले करार संपले की ते चित्रपट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जातात. नवीन वर्षात नेटफ्लिक्स स्वतःचे ओरिजिनल कंटेंट आणि नवीन करार करण्यावर भर देत असल्याने ही काटछाट केली जात असल्याचं बोललं जात आहे.
