नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये परागने सांगितले की, शेफालीच्या निधनानंतरही त्यांच्या घरात तिची उपस्थिती अनुभवायला मिळत होती. "ती गेल्यानंतरही दोन-तीन दिवस तिची ऑनलाइन खरेदीची पार्सल येत होती. मी ती पार्सल उघडत होतो कारण त्या प्रत्येक वस्तूत तिचा अत्तर आणि आठवण होती," असं पराग म्हणाला.
काजोल की राणी मुखर्जी? दोन्ही बहिणींमध्ये कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत
advertisement
परागने पुढे सांगितले की, तो तिच्या ब्रशने दात घासतो. त्याने अजूनही शेफालीचे काही कपडे जपून ठेवलेत. "मी तिचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स न धुतलेले ठेवलेत. त्यांचा सुगंध मला तिच्याजवळ असल्याची आठवण करून देतो. मी तिच्या ब्लँकेटवर झोपतो आणि टी-शर्ट माझ्या हाताला गुंडाळून झोपतो," असं त्याने सांगितलं.
परागने शेफालीच्या शेवटच्या क्षणांची स्मृतीही शेअर केली. त्याच्या म्हणण्यानुसार, शेफालीने शेवटच्या वेळी त्याला सांगितले होते की सिम्बा (त्यांचा कुत्रा) घेऊन बाहेर जा. पराग परतला तेव्हा त्याला कळाले की शेफाली बेशुद्ध झाली आहे. त्याने तिला इलेक्ट्रोलाइट पाणी आणि CPR देण्याचा प्रयत्न केला, पण ती गेली होती.
https://youtube.com/shorts/FVB335xC9EU?si=hPYDa57QQFocJBwo
शेफालीच्या निधनाबाबत पसरलेल्या अँटी-एजिंग औषधांबाबतच्या अफवांवर परागने स्पष्ट केले की, शेफालीने कधीही हानिकारक औषधे घेतली नव्हती. ती नियमितपणे मल्टीविटामिन घेत होती आणि महिन्यातून एकदा आयव्ही ड्रिपद्वारे जीवनसत्त्वांची पूर्तता करत होती.