ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना आणि वैभव धमाकेदार डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहेत. अत्यंत सुंदर आणि रोमँटिक स्टेप्सने हा परफॉर्मन्स खुलून आला आहे. घरातील दोघांची मैत्री, केमेस्ट्री डान्समध्ये देखील दिसून येत आहे. डान्सची झलक इतकी सुंदर तर पूर्ण परफॉर्मन्स किती छान असेल अशी उत्सुकता आता चाहत्यांमध्ये आहे.
बिग बॉस मराठीचे Super 6, Grand Finale मध्ये दाखवणार डान्सचा जलवा, Video
advertisement
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या भव्यदिव्य ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला आज (6 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी 5 चे सुपर 6 निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालवणकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर बनले आहेत. आज ग्रँड फिनालेमध्ये या सुपर 6 चा डान्सचा जलवा पाहायला मिळणार आहे. सोबत बिग बॉसच्या बाकी सदस्यांचेही डान्स असणार आहेत.