अभिनेता जयदीप अहलावत हे आज ओटीटी जगातले प्रसिद्ध नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाने जयदीपने सिनेदुनियेत आपलं नाव कमावलं आहे. सिनेमा आणि ओटीटी जगात धुमाकूळ घालणाऱ्या जयदीपने सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केलं. याविषयी अभिनेत्याने स्वतःच खुलासा केला.
OTT Release: पाताल लोक 2 ते द रोशन्स! वीकेंडला पाहा 'या' 5 मूव्ही-सीरीज, फूल ऑन एंटरटेनमेंट!
advertisement
काय म्हणाला अभिनेता जयदीप अहलावत?
Times Now India सोबत केलेल्या बातचीतमध्ये अभिनेत्याने त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली. अभिनेता म्हणाला, "माझं स्वप्न आर्मीत जाण्याचं होतं. पण नंतर मन बदललं आणि अभिनय करण्याचं डोक्यात आलं. सुरुवातीला खूप रिजेक्शन मिळालं. रिजेक्शन नवर रिजेक्शन मिळताना पाहून माझी आईदेखील चिंतेत आली होती. आई मला म्हणाली, 'सरकारी नोकरी कर, आमदार माझ्या ओळखीचा आहे. मी फोन करून तुझी नोकरी लावते.' पण मी आईचा सल्ला ऐकला नाही."
अभिनेता पुढे म्हणाला, "माझं पहिलं ऑडिशन 'इश्किया'साठी दिलं होतं. पण तो सिनेमा मला मिळाला नाही. मग मला 'गॅंग्स ऑफ वासेपूर' मिळाला. हा सिनेमा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला."
दरम्यान, अभिनेता जयदीप अहलावतची 'पाताल लोक' सीरिज लोकांनी खूप पसंत केली. त्याच्या इंस्पेक्टर हाथीरामच्या भूमिकेला एवढं प्रेम मिळालं की दुसरा सीझनही आला. इंस्पेक्टर हाथीराम ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. अमेझॉन प्राइमवर तुम्ही ही सिरीज पाहू शकता.
