5.5 कोटींच्या चित्रपट करारात थकबाकी
बंगळुरूतील VerSe Innovations Pvt. Ltd. या नामांकित टेक कंपनीने बर्दापूरकर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. या कंपनीने ‘राव साहेब’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी Planet Marathi Seller Services Pvt. Ltd. या कंपनीला 5.5 कोटी रुपये दिले होते. विशेष म्हणजे, या रकमेवर अक्षय बर्दापूरकर यांनी वैयक्तिक हमी दिली होती. मात्र, कराराचे पालन न झाल्यामुळे VerSe कंपनीने थकबाकीसाठी थेट बर्दापूरकर यांच्यावरच जबाबदारी टाकली आहे.
advertisement
( मुंबईतील 60 तरुणांना नोकरीचं आमिष, थायलँड सांगून चीनच्या दिलं ताब्यात, प्रसिद्ध OTT स्टार अटकेत )
ही कारवाई वेगळी
Planet Marathi कंपनीवर आधीपासूनच कॉर्पोरेट दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र ही नवीन तक्रार पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाची आहे. त्यामुळे अक्षय बर्दापूरकर यांच्यावर आता दोन स्वतंत्र स्तरांवर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाकडे मराठी चित्रपटसृष्टीत सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
VerSe ही कोणती कंपनी आहे?
VerSe Innovations ही कंपनी Dailyhunt आणि Josh सारख्या मोठ्या अॅप्सची मालकीण आहे. अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. आपले आर्थिक हितसंबंध वाचवण्यासाठी कंपनीने कायदेशीर मार्ग अवलंबल्याचे स्पष्ट केले आहे.
बर्दापूरकरांचं स्पष्टीकरण – “चित्रपट पूर्ण आहे, पैसे लवकरच फेडणार”
या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना अक्षय बर्दापूरकर म्हणाले, "आमचा 'राव साहेब' हा चित्रपट तयार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या समस्येवर आपोआप तोडगा निघेल. 'राव साहेब' हा चित्रपट तयार करून तो प्रदर्शित झाल्यावर त्यांचे पैसे देणार आहे. 'राव साहेब' तयार असून, सेन्सॅार प्रमाणपत्र मिळाल्यावर जून-जुलैमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल." या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं असून, सध्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया सुरू आहे.
