TRENDING:

Prachi Pisat : 'सर्वच मुली त्यांच्यासाठी...' प्राची पिसाट प्रकरणावर अभिनेत्री संतापली, म्हणाली 'या लोकांमुळेच...'

Last Updated:

Prachi Pisat : लोकप्रिय अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्राची पिसाटने (Prachi Pisat) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकणारे अभिनेते सुदेश म्हशिलकर (Sudesh Mhashilkar) यांनी प्राचीला 'तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये' असा अश्लील मेसेज केल्याचा स्क्रीनशॉट प्राचीने शेअर केला आहे. या पोस्टनंतर मराठी सिनेसृष्टीतील 'काही' लोकांचा खरा चेहरा समोर आला आहे.
लोकप्रिय अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकप्रिय अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement

मेसेज व्हायरल, अकाउंट हॅकच्या अफवा

प्राचीने फेसबुकवर हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर, सुरुवातीला अनेकांनी कमेंट करत असा अंदाज लावला की, कदाचित अभिनेत्याचे अकाउंट हॅक झाले असावे. मात्र, प्राचीने आणखी काही स्क्रीनशॉट शेअर करत, सुदेश म्हशिलकर यांचे अकाउंट हॅक झालेले नाही, हे स्पष्ट केले. प्राचीने इंडस्ट्रीतील हे कटू वास्तव मांडणारी पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी तिला पाठिंबा दिला आहे.

advertisement

प्राचीने इन्स्टाग्राम स्टोरीवर असेही म्हटले आहे की, तिला ही पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव आणण्यात आला. तसेच, हा विषय ती संपवायला तयार आहे, मात्र त्यापूर्वी सुदेश म्हशिलकर यांनी फेसबुकवर जाहीर माफी मागावी, अशी तिची मागणी आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्ट्स 'marathiserials_official' या मराठी मालिकांविषयी अपडेट देणाऱ्या इन्स्टाग्राम पेजने शेअर केल्या आहेत. त्यावर 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) फेम कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे (Prajakta Kulkarni Dighe) हिनेही कमेंट केली आहे.

advertisement

इंडस्ट्रीतील गैरसमज दूर व्हायलाच हवा - प्राजक्ता कुलकर्णी

प्राजक्ता कुलकर्णीने प्राचीला पाठिंबा दर्शवत म्हटले आहे की, "प्राची एकदम छान केलंस ही पोस्ट शेअर करून. कारण इंडस्ट्रीमधील काही लोकांना वाटतं की सगळ्याच मुली अशा असतात आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. हा त्यांचा गैरसमज दूर व्हायलाच हवा. काही लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम आहे, ती तरी होणार नाही. आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करून आमच्या फॅमिलीसोबत अगदी प्रामाणिकपणे राहतो." प्राजक्ता यांच्या या कमेंटवर प्राचीने उत्तर देत म्हटले, "ताई, खूप खूप धन्यवाद. मलाही तुमचा अभिमान आहे. एक आई म्हणून तुम्ही कायमच आजूबाजूच्या अनेक मुलींना धाडसी होण्यासाठी प्रेरणा दिली आहे."

advertisement

शिल्पा नवलकर आणि मीरा जगन्नाथ यांचाही पाठिंबा

'ठरलं तर मग' मालिकेच्या लेखिका आणि मालिकेत प्रतिमा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर (Shilpa Navalakar) यांनीही प्राचीच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. शिल्पा यांनी म्हटले, "Way to Go प्राची, गप्प नाही बसायचं." त्यावर प्राचीने असे उत्तर दिले होते, "शिल्पा ताई, गेल्या १२ तासात तू पहिलीच महिला असशील जिने मला 'गप्प बस' असे नाही सांगितले. धन्यवाद." प्राचीने शिल्पा आणि प्राजक्ता यांच्या कमेंटचा स्क्रीनशॉटही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्री मीरा जगन्नाथनेही (Meera Jagannath) प्राचीच्या एका पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दर्शवला.

नेमकं काय घडलं?

प्राचीने २४ मे रोजी फेसबुकवर काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्यात सुदेश म्हशिलकर यांनी तिला असे मेसेज केले होते, "तुझा नंबर पाठव... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये... कसली गोड दिसतेस." आणखी एक मेसेज असा होता, "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली... वाह." हे स्क्रीनशॉट शेअर करताना प्राचीने लिहिले होते, "आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली... बायकोचा नंबर असेलच... तीही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का सुदेश म्हशिलकर! ही पोस्ट डिलीट करायला सांगण्यासाठी कुठूनतरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच."

प्राचीने हे स्क्रीनशॉट २५ मे रोजी इन्स्टाग्रामवरही शेअर केले. तिने लिहिले की, "हो, आहे मी गोड. चला आता विषय संपवूया सुदेश म्हशिलकर. इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ नसेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्से सांगू शकते."

याशिवाय तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, "मला धमकावलं गेलं आणि दबाव टाकण्यात आला की मी ही पोस्ट डिलीट करावी आणि गप्प बसावं… पण मला वाटतं ही पोस्ट माझ्या इन्स्टा फीडवर असायला हवी, 'अशी आता माझी इच्छा झाली'. चला विषय संपवूया… जोपर्यंत सुदेश म्हशिलकर माफी मागत नाही, माझ्या नंबरवर नाही तर Fb फीडवर..." तिने हेही स्पष्ट केले की, हे कोणत्याही हॅकरचे काम नाही, तिने वारंवार तपासल्यानंतरच या पोस्ट केल्या आहेत. याशिवाय अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Prachi Pisat : 'सर्वच मुली त्यांच्यासाठी...' प्राची पिसाट प्रकरणावर अभिनेत्री संतापली, म्हणाली 'या लोकांमुळेच...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल