TRENDING:

भ्रम की वास्तव? धमाकेदार नाटकातून प्रिया बेर्डेंचं रंगभूमीवर कमबॅक, कधी अन् कुठे होणार पहिला प्रयोग?

Last Updated:

Priya Berde: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रिया बेर्डे पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: रहस्याचा धूर, काळजाचा ठोका चुकवणारी वळणं आणि सत्य-असात्याच्या पलीकडचा एक अजब अनुभव... मराठी रंगभूमीवर लवकरच एक नवा धमाका होणार आहे. मानवी मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या गूढ गोष्टींना वाचा फोडणारं ‘भुल भुलैय्या’ हे नाटक आता रसिकांच्या भेटीला सज्ज झालं असून, या नाटकाच्या निमित्ताने एक खास सरप्राईज देखील प्रेक्षकांना मिळणार आहे.
News18
News18
advertisement

प्रिया बेर्डे यांचं दिमाखदार पुनरागमन

या नाटकाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रिया बेर्डे पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. आपल्या या कमबॅकबद्दल बोलताना त्या म्हणतात, "मी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते, फक्त एका कसदार संहितेची वाट पाहत होते. 'भुल भुलैय्या'च्या निमित्ताने ती प्रतीक्षा संपली असून, पुन्हा एकदा नाटकाच्या तालीम आणि प्रयोगाचा थरार अनुभवताना खूप आनंद होत आहे."

advertisement

‘भुल भुलैय्या’- रहस्याचा नवा खेळ

हेमंत एदलाबादकर यांची कथा असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केले आहे. रंगत संगत आणि श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स यांची ही निर्मिती असून रणजित देसाई आणि केदार सामंत यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नाटकात प्रिया बेर्डे यांच्यासोबत आरती सोळंकी, साहिल देसाई, परिणिता पावसकर यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विजय गवंडे यांचं संगीत आणि संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य या नाटकातील गूढ वातावरण अधिक गडद करणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

दरम्यान, या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रविवार १९ एप्रिलला दुपारी ४.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी; सोमवारी २० एप्रिल रात्री ८.०० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे; मंगळवारी २१एप्रिल दुपारी ४.०० वाजता दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे रंगणार आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
भ्रम की वास्तव? धमाकेदार नाटकातून प्रिया बेर्डेंचं रंगभूमीवर कमबॅक, कधी अन् कुठे होणार पहिला प्रयोग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल