दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे हे प्रिया मराठेचे सासरे होते. मात्र त्यांच्यातील नातं सासू-सुनेचं नाही तर वडील-लेकीचं होतं. जेव्हा श्रीकांत मोघेंचं निधन झालं तेव्हा प्रिया एकदम तुटून गेली होती. तिने त्यांच्यासाठी शेअर केलेली पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रिया मराठेने मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती, आकडा थक्क करणारा!
advertisement
प्रिया तिच्या सासऱ्यांना 'ऐ बाबा' म्हणूनच हाक मारायची. जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा प्रियाने लिहिलं होतं, "माझा बाबा! इतकं प्रेम , माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. "सासरे " फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. "माझं पीयूडं" ," माझं लाडकं" अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की "आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे " असे सगळे प्रश्न विचारायचा.
बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायच. गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्सहच कायम पहिला. "मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे" हे धोरण मानून कश्यातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील.
दरम्यान, आता प्रियाच्या जाण्यानं संपूर्ण कलाविश्व, कुटुंब, मित्र-परिवार सर्वजणच दुःखात आहे. तिच्यासाठी सर्वजण भावनिक पोस्ट करुन तिच्या आठवणी शेअर करत आहेत.