TRENDING:

Pushkar Jog House Fire : 'मी अडकलोय, मला वाचवा...' अभिनेता पुष्कर जोग लेकीसह आगीत अडकला, शेवटच्या क्षणी रिअल हिरोंनी वाचवलं

Last Updated:

पुष्कर जोगच्या मुंबईतील घराला भीषण आग लागली, तो आणि त्याची मुलगी अडकले होते. पुष्करच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोगच्या मुंबईतील घराला भीषण आग लागली आहे. पुष्कर जोग त्याच्या मुलीसह या घरात अडकला होता. अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत मदतीची मागणी केली होती. या आगीत त्याच्या घराचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. पुष्करनं व्हिडीओ शेअर करत घराची झालेली दुरावस्था दाखवली. त्याचप्रमाणे त्याने मुंबई पोलीस आणि अग्नीशमन दलाचे आभार देखील मानले.
News18
News18
advertisement

पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटलं होतं, "माझ्या इमारतीला आग लागली आहे. मी त्यात अडकलो आहे. माझी मदत करा. मी घरातून बाहेर पडू शकत नाहीये. माझ्यासोबत माझी मुलगी आहे. सर्वत्र आग लागली आहे."

पुष्करच्या घराला आग लागल्याचं समजताच अग्नीशमनगलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं आहे. पुष्करचं घर जळून खाक झालं आहे. पुष्करनं घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यानं पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "अग्निशनमन दल, BMC आणि मुंबई पोलीस हे रिअल हिरो आहेत. त्यांच्यामुळे आज मी बजावलो आहेत. पण माझं संपूर्ण घर जळालं आहे."

advertisement

अभिनेता पुष्कर जोग हा दुबईला शिफ्ट झाला होता. त्याला दुबईचं नागरिकत्व मिळालं होतं. त्याने काही दिवासांआधीच पोस्ट करत ही माहिती दिली होती. कामानिमित्तानं तो त्याच्या मुंबईतील घरी आला होता तेव्हाच ही घटना घडली.

advertisement

अभिनेता पुष्कर जोगचा ह्युमन कोकिन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पुष्कर जोग हिंदी सिनेमात डेब्यू करतोय.  आजपर्यंत रोमँटीक, चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर जोग क्रूर, खूनशी रुपात दिसणार आहे. हा सिनेमा 30 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
12 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, लाखोंचे उत्पन्न
सर्व पहा

पुष्कर जोग काही वर्षांआधीच त्याच्या कुटुंबासह दुबईत शिफ्ट झाला आहे. त्याची पत्नी जास्मिन आणि मुलगी फेलिशा यांच्यासह तो दुबईत असतो. पुष्कनं जोगनं अभिनयबरोबरच निर्माता म्हणूनही पदार्पण केलं आहे. पुष्करचे 'हार्दिक शुभेच्छा', 'अदृश्य', 'ए.आय.धर्मा स्टोरी' असे काही सिनेमे मागच्या काळात रिलीज झाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushkar Jog House Fire : 'मी अडकलोय, मला वाचवा...' अभिनेता पुष्कर जोग लेकीसह आगीत अडकला, शेवटच्या क्षणी रिअल हिरोंनी वाचवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल