राजपाल यादवच्या भाचीच लग्न सध्या मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी सोहळ्यात संपूर्ण कुटुंबाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. याच मेहंदी सोहळ्यात राजपालने पत्नी आणि इतर कुटुंबीयांसोबत डान्स केला. राजपालने बायकोबरोबर सलमान खानच्या गाण्यावर ठेका धरला.
( एसीपी प्रद्युम्न ते दया! CID चे कलाकार आता आहेत कुठे, करतात काय? )
advertisement
राजपाल यादवने ‘तेरी चुनरिया’ या फेमस गाण्यावर धमाल डान्स केला. Hello Brother या सिनेमातील सलमान खानचं हे गाणंआजही लग्नसमारंभांमध्ये तितकंच लोकप्रिय आहे. न्यायालयीन प्रक्रियेचं टेन्शन असतानाही राजपाल यादवने कुटुंबासाठी आनंदाचे क्षण जपले. मेहंदी सोहळ्यात तो पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसला. पत्नीचा हात धरून केलेला त्याचा डान्स आणि कुटुंबीयांसोबतचे हास्यविनोद करत तो व्यक्त झाला.
सोशल मीडियावर या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजपाल यादवचा हा हसरा चेहरा पुन्हा पाहायला मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 9 कोटींचं टेन्शन काही काळासाठी बाजूला ठेवून त्याने भाचीच्या लग्नात दाखवलेला आनंदी चेहरा सगळ्यांना भावुक करून गेला.
राजपाल यादवने जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले. 9 कोटींपैकी 1.5 कोटी रुपये कोर्टाच जमा केल्यानंतर राजपाल यादवला जेलमधून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1.5 कोटींबरोबरच त्याने त्याचा पासपोर्टही कोर्टात जमा केला आहे.
इतकंच नाही तर बाहेर आल्यानंतर त्याने इंडस्ट्रीला आवाहन केलं आहे की त्याला कामाची गरज आहे. तुम्ही मला कितीही पैसे द्या, पण मला काम द्या. मला काम करायची इच्छा असल्याचं राजपाल यादवने सांगितलं.
