भालचंद्र कुलकर्णी
18 मार्च 2023 रोजी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. माहेरची साडी या सिनेमात त्यांनी अलका कुबल यांच्या वडिलांची भुमिका साकारली होती. शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं सारख्या अनेक सिनेमात त्यांनी काम केलं होतं.
advertisement
हेही वाचा - माधुरी दिक्षितच्या मराठमोळ्या नवऱ्याचं मराठी ऐकलत का? डॉ. नेनेंचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
सुलोचना लाटकर
4 जून 2023 हा दिवस मराठी इंडस्ट्रीसाठी वाईट ठरला कारण अभिनेत्री सुलोचना लाटकर याचं निधन झालं. मराठी सिनेसृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. वयाच्या 94व्या वर्षी सुलोचना यांनी जगाचा निरोप घेतला.
रवींद्र महाजनी
मराठी इंडस्ट्रीला हादरवून सोडणारा 15 जुलै हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. मराठी इंडस्ट्रीत एक काळ गाजवलेला, हँडसम अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह पुण्याच्या तळेगावातील फ्लॅटमध्ये आढळून आला. वयाच्या 77व्या वर्षी त्यांचं कार्डियक अरेस्टनं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर एकच खळबळ उडाली होती.
जयंत सावरकर
मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते ज्यांनी त्यांच्या 70वर्षांच्या कारकिर्दीत मराठी नाटक, मालिका, सिनेमा आणि ओटीटी अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करून नाव कमावलं. असे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं 24 जुलै 2023 रोजी निधन झालं.
हेही वाचा - जुईची इंदूर ट्रिप! मराठमोळ्या पेहरावात अभिनेत्री पोहोचली महाकालेश्वराच्या दर्शनाला, PHOTO
नितीन चंद्रकांत देसाई
2 ऑगस्टचा दिवस देखील अनेकांच्या लक्षात असेल. या दिवशी मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे.
सीमा देव
मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. रमेश देव यांच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 24 ऑगस्ट 2023रोजी अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं. मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सीमा देव अनेक वर्ष अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या.
मिलिंद सफाई
सीमा देव यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंग सफाई यांच 25 ऑगस्ट 2023 रोजी निधन झालं. मिलिंद यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.