आपण बोलत असलेला हा सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आहे. त्याचा 'कांतारा' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटानंतर ऋषभचे नाव संपूर्ण देशभर गाजले. आता त्याचाच सीक्वल कांतारा चॅप्टर 1, 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला.
advertisement
'मी घाबरलो होतो...' जया बच्चन समोर अन् अमिताभ यांना फुटला घाम; नेमकं काय घडलेलं?
ट्रेलर लाँचच्या वेळी ऋषभ शेट्टी भावनिक झाला. तो म्हणाला, "गेल्या तीन महिन्यांपासून कामाच्या ताणामुळे नीट झोपही झाली नाही. प्रत्येकाने या प्रोजेक्टला स्वतःच्या चित्रपटासारखं मानलं. शूटिंग दरम्यान मी चार-पाच वेळा जीव धोक्यात घातला, पण देवाच्या कृपेने वाचलो." त्याच्या या विधानाने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले.
सोशल मीडियावर मात्र कांताराबद्दल एक वेगळाच वाद पेटला आहे. "धूम्रपान नाही, दारू नाही आणि मांस नाही" असे लिहिलेलं एक पोस्टर व्हायरल झाले. यावर स्पष्टीकरण देताना ऋषभ म्हणाला, "हे पोस्टर आम्ही तयार केलेले नाही. कोणी लोकप्रियता मिळवण्यासाठी बनावट पोस्ट टाकली आहे. आम्हाला अशा अफवांवर प्रतिक्रिया द्यायची नाही."
दरम्यान, कांतारा चॅप्टर 1 मध्ये कथेचा उगम दाखवला जाणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे पुराणकथांवर आधारित असून, यात ऋषभ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मूळ कांताराने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. त्यामुळे आता सीक्वल किती मोठा विक्रम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.