रितेश देशमुखचं शरीर खूप लवचिक आहे. दररोज गांभीर्याने, कधीही न विसरता रितेश भाऊ वर्कआऊट करतो. दररोज व्यायाम किंवा योग करण्यावर रितेशचा भर असतो.
रितेश देशमुख शाकाहारी आहे. दररोज न चुकता तो पाले भाज्यांचं सूप पितो. सर्व भाज्या तो आवडीने खातो.
advertisement
रितेश देशमुख चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा दररोज ग्रीन टी पिण्यावर भर देतो. रितेशच्या जीवनशैलीत ग्रीन टी अग्रस्थानी आहे. शरीराला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी ग्रीन टी महत्त्वाचं असल्याचं रितेशनचं म्हणनं आहे.
रितेशच्या आहारात टोमॅटो, भोपळा, मशरुम, ओट्स या गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी खाऊन डाएट करण्यावर रितेशचा भर असतो.
रितेश देशमुख नियमितपणे योग करतो. मानसिक स्वास्थ्यासाठी रितेश दररोज योग करतो.
रितेश शूटिंग असो वा नसो पण एक पाण्याची बॉटल नेहमी आपल्यासोबत ठेवतो. संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पित रितेश ताजेतवाना राहतो.
शारिरिक फिटनेससह रितेश देशमुखने मानसिक स्वास्थ्यावरही तेवढाच भर दिला आहे. सुपरस्टारचं फिटनेस आजही अनेकांना प्रेरणा देतं.