'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या.
( मर्डर मिस्ट्री ते थ्रिलर ड्रामा! एप्रिल महिन्यात OTT वर धमाका, ही घ्या फिल्म अन् वेब सीरिजची लिस्ट )
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून ऐतिहासिक विषयाला आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
advertisement
या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी,अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख , आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे.
यात थरारक ॲक्शन दृश्ये, वेधक आणि भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभे करणारे संगीत यामुळे हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा न राहता एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे 'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट तर आहेच याशिवाय भारताच्या ऐतिहासिक वारस्याला जागतिक स्तरावर सादर करण्याची क्षमता ठेवतो.
'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या उदयाला समर्पित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
