TRENDING:

लग्नाची 14 वर्षे आणि हा वनवास..! एनिवर्सरीला रितेश भाऊची जेनिलिया वहिनीसाठी पोस्ट, VIDEO

Last Updated:

Ritesh Deshmukh Genelia D'Souza Anniversary : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं रितेशनं खास पोस्ट आणि रोमँटिक रील शेअर केलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी प्रेक्षकांचे लाडके दादा वहिनी म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख. आज 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाला तब्बल 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास दिवसानिमित्त रितेशनं जेनिलियासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. दोघांचा एकत्रित रील व्हिडीओ देखील त्याने शेअर केला आहे. रील पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. रितेशनं जेनिलियासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. दोघांचा रोमँटिक रील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
News18
News18
advertisement

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं जेनिलियासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "14 वर्ष झाली लग्नाला, हा वनवास कधीच संपू नये. हैप्पी वाली एनिवर्सरी बायको!!" रितेशच्या या मजेशीर पण प्रेमळ कॅप्शनने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. एक गोड टोमणा आणि प्रेम दोन्ही त्याने व्यक्त केलं आहे.

( Riteish - Genelia Wedding : 14 वर्षांचा संसार, रितेश - जेनिलियाच्या लग्नाचे UNSEEN PHOTO, 11व्या फोटोवरून नजरच हटणार नाही )

advertisement

या पोस्टसोबत रितेशनं दोघांचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितच्या दिल तो पागल हैं सिनेमातून 'चाक धूम धूम' या गाण्यावर दोघांनी हा रील केला आहे. व्हिडीओमध्ये दोघांची केमिस्ट्री, मस्ती आणि प्रेम अनेक दिवसांनी चाहत्यांना पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.

advertisement

रितेश आणि जेनिलियाचं लग्न 3 फेब्रुवारी 2012 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. त्यांच्या लग्नाला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतरही दोघांमधील प्रेम आणि जिव्हाळा तसाच कायम असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. रितेश आणि जेनिलियाचं लग्न दोन वेगवेगळ्या परंपरांनुसार झालं होतं. आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनं त्यांनी लग्न केलं होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

एनिवर्सरीनिमित्त रितेशची पोस्ट समोर येताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. चाहत्यांनी त्यांना आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रितेश-जेनिलियाची जोडी ही बॉलिवूडच नाही तर मराठीतील सर्वात लव्हेबल कपल म्हणून हिट आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्नाची 14 वर्षे आणि हा वनवास..! एनिवर्सरीला रितेश भाऊची जेनिलिया वहिनीसाठी पोस्ट, VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल