अभिनेत्री रिंकू राजगुरूची आजी देखील तिच्यासारखीच फोटोजेनिक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रिंकू राजगुरूच्या आईला तर सर्वांनी पाहिलं आहे. रिंकूची आई खूप स्ट्रिक्ट आहे असं रिंकूने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. तुम्ही रिंकूच्या आजीला पाहिलंय का? रिंकूची आजी म्हणजेच तिच्या वडिलांची आई. रिंकूला आजी आणि आजोबा दोन्ही आहेत. दोघेही अकलूजमध्ये राहतात. रिंकूची आजी आणि तिच्या आईचं खूप छान बॉन्डिंग आहे. रिंकू आणि तिच्या भावावरही तिची खूप प्रेम आहे.
advertisement
( Rinku Rajguru : आईच्या 'दुसऱ्या' लग्नात करवली बनली रिंकू राजगुरू, साडी नेसून थाटात मिरवली, PHOTO )
रिंकूच्या आईचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यास त्यावर रिंकूच्या संपूर्ण फॅमिलीचे फोटो पाहायला मिळतात. या फोटोंवरून एक गोष्ट लक्षात येते की राजगुरू कुटुंबांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. रिंकूच्या आईने सासूबाईंबरोबरचा म्हणजेच रिंकूच्या आजीबरोबरचा एक फोटो आहे. ज्यात दोघींनी हनुवटीवर हात ठेवून फोटो क्लिक केला आहे.
रिंकूच्या आजीने निळी नऊवारी साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर असा साजिरा पारंपरिक वेशात त्या आहेत.
रिंकूच्या आई आणि वडिलांच्या लग्नाला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झालीत. लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. दुसऱ्यांदा लग्न केल्याचे फोटो रिंकूच्या आईने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.