ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर सलीम खान अनेक दिवस रुग्णालयात होते. वयाच्या 90 व्या वर्षी सलीम खान यांनी ब्रेन हॅमरेजला मात दिली. काही दिवसांआधीच घरी परतलेल्या सलीम खान यांनी ईदच्या दिवशी समोर येत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.
गॅलेक्सीवरची ही इमोशनल मोमेंट कॅमेरात कैद झाली. सलीम खान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सलमान खान दरवर्षी त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. सलमान खानसोबत दरवर्षी वडील सलीम खानसुद्धा असतात. यावर्षीही खान पितापुत्रांनी त्यांची कमिटमेन्ट पाळली.
लेखक सलीम खान यावेळी व्हिलचेअरमध्ये बसलेले दिसले.त्यांच्याबरोबर मुलगा सोहेल खान, अरबाज, अर्पिता सलमान खानची भाची आणि भाचा, सलमान खानच्या दोन्ही आई देखील उपस्थित होत्या. गेली काही दिवस सलीम खान रुग्णालयात असल्याने संपूर्ण खान कुटुंब चिंतेत होतं. पण आता सगळे सलीम खान यांच्याबरोबर घरी ईद साजरी करत आहेत. खान कुटुंबाला हसताना पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेता सलमान खानचा बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी त्याने सिनेमाबाबत मोठा निर्णय घेतला. सिनेमाचं नाव बदलून आता मातृभूमी असं ठेवण्यात आलं आहे. ईदच्या काही दिवसांआधीच सलमान खानने हा निर्णय घेतला.
