TRENDING:

Santosah Juvekar : हे माझं Manifestation होतं..! विक्की कौशलनंतर थेट बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर करणार संतोष जुवेकर

Last Updated:

संतोष जुवेकर छावा सिनेमानंतर नव्या हिंदी सिनेमात दिसणार आहे. विक्कीनंतर तो बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेता संतोष जुवेकर गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकात त्यानं काम केलं. मराठी सिनेमाबरोबर त्याने हिंदीतही काम केलं. संतोष जुवेकर अलीकडेच Chhaava या हिंदी चित्रपटात दिसला होता. या सिनेमात त्याने Vicky Kaushal सोबत स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही कौतुक केलं. मात्र, सोशल मीडियावर काहींनी त्याला ट्रोलही केलं होतं. तरीही संतोषने त्या सगळ्याकडे सकारात्मकतेने पाहत आपला प्रवास सुरू ठेवला.
News18
News18
advertisement

छावानंतर संतोष जुवेकर आणखी एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. विक्की कौशलनंतर तो आता थेट बॉबी देओलबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. त्याने हा सिनेमा मॅनिफेस्ट केला होता, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलंय. त्याने सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'बंदर' असं संतोषच्या हिंदी सिनेमाचं नाव आहे.

( Rinku Rajguru : केदारनाथ मंदिरासमोर पडून फुटली होती रिंकू राजगुरूची ढोपरं, त्या चुकीची मिळाली शिक्षा! )

advertisement

संतोष जुवेकरनं सिनेमाचं पोस्ट शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, माझ्या अनेक manifestations मधलं हे एक manifestation होत मला अनुराग कश्यप सरांन सोबत काम करायचय आणि ते पूर्ण झालं “बंदर” ह्या सिनेमात मला काम करण्याची संधी मिळाली."

"कम्मालीचा अनुभव होता अनुराग सर ह्या अवलिया सोबत आणि त्यांच्या कम्माल team सोबत काम करण्याचा. ह्या 22 मे ला हा सिनेमा रिलीज होतोय. मी युनिव्हर्सचे आणि ज्यांच्या मुळे मला ही संधी मिळाली त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वातावरण साथ देईना,होतंय नुकसान? शेतीतले 5 यशस्वी प्रयोग, पैसा घरी येईल चालत!
सर्व पहा

संतोषच्या नव्या सिनेमाची त्याने घोषणा करताच त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, तुम्ही ज्या मुव्हीमध्ये काम करत ती हिट होते. दुसऱ्याने लिहिलंय, संतोष दादा खरंच अभिनंदन पण खरंच स्ट्रगल सालामध्ये मिस करतोय.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Santosah Juvekar : हे माझं Manifestation होतं..! विक्की कौशलनंतर थेट बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर करणार संतोष जुवेकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल