सान्याचे ट्रेनर त्रिदेव पांडे यांनी अलीकडेच सांगितले की, सान्याचं वजन 56 किलो होतं. सान्या रोज व्यायाम करत होती आणि साधं घरचं जेवण जेवत होती. 3 महिन्यांचं टार्गेट ठेऊन तिने आपलं वजन कमी केलं आहे.
तीन महिने सान्या पुश-अप्स करत होती. वजन कमी करायला तिला हे खूप फायदेशीर ठरलं. ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये तिने विविध प्रकारचे व्यायाम केले.
advertisement
सान्याचा ट्रेनर म्हणतो,"मागील 8 वर्षांपासून मी सान्यला ट्रेनिंग देत आहे. तिला विविध भूमिकांसाठी कधी वजन वाढवावं लागतं तर कधी कमी करावं लागतं, त्यामुळे प्रत्येक वेळी नव्यानं आणि अधिक बळकटपणे काम करणं सोपं नसतं".
सान्याचा ट्रेनर पुढे म्हणाला,"पण या भूमिकेसाठी आम्ही वेळ वाढवून एक वेगळ्या प्रकारचा चॅलेंज स्वीकारला होता. आणि हाच परिणाम हवा होता. परिणाम कधीच पुरेसा नसतो, पण प्रत्येक वेळी आपलं सर्वोत्तम देणं महत्त्वाचं असतं".
सान्या मल्होत्राने दररोज व्यायाम आणि योग्य डाएट करुन आपलं वजन कमी केलं आहे. आता ती पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि स्लिम झाली आहे.
सान्याच्या वर्कआऊट रुटिनमध्ये स्किपिंग, वेट लिफ्टिंग, स्ट्रॅथनिंग, किकबॉक्सिंग आणि स्क्वाट्सचा समावेश होता. परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.
