अशी राहिली केळीची आवक
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 605 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 380 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 187 क्विंटल केळीस 1000 ते 3650 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गाय-म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज
गुळास चांगला उठाव
राज्याच्या मार्केटमध्ये 1067 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 332 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 4175 ते 4415 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 274 क्विंटल गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
आल्याच्या आवक स्थिर
राज्याच्या मार्केटमध्ये 2876 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी चंद्रपूर मार्केटमध्ये 1050 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 1300 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 3100 ते 4600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
तीळास चांगला उठाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 252 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 225 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





